ताज्या घडामोडी

पिंपळे गावचे सरपंच गायत्री पाटील सह सदस्यांची शासकीय कार्यालयांना अकस्मात भेटी

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

अमळनेर तालुक्यातील गृप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द येथील बालिका स्नेही ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी बुधवारी येथील शासकीय कार्यालयांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. अशा प्रकारचा तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने त्याचे कौतुक होत आहे.सरपंच गायत्री पाटील उपसरपंच साक्षी पाटील व सदस्यांनी पाटील, प्रथम लोकनेते महिला सरपंच वर्षा पाटील ग्रामसेवक के के लंकेश सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील व ज्ञानेश्वर पाटील सर पुरुषोत्तम चौधरी यांनी पंचायत समिती व

तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन येथे कामकाजाची माहिती घेण्यासाठी भेट दिली. भेटीदरम्यान पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी एन आर पाटील, विस्तार अधिकारी कटार्‍यां अण्णा व तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी वैद्यकीय अधिकारी संजय रनाडकर प्रशांत फुगे यांनी डांग्या खोकला थुंकी तपासणे रक्त तपासणी एक्स-रे गर्भवती महिलांना विषय मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या प्रत्येक विभागात महिलांनी आणि विद्यार्थिनींनी भेट दिली. येथील

तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी त्यांना प्रत्येक शासकीय विभागाच्या कामकामाची माहिती दिली. पोलिस ठाण्यात महाविद्यालयाच्या मुलींना एसटी प्रवासात होणाऱ्या त्रासाबद्दल पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकुंभ पोलीस रवींद्र पिंगळे साहेबांनी मार्गदर्शन केले. पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे सहकार्य केले ग्रामीण भागातील महिला आणि विद्यार्थ्यांना प्रथमच शासकीय कार्यालयात जाऊन तेथील कामकाजाची थेट माहितो घेता आल्याने विद्यार्थिनींनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??