अंजनविहिरे येथील स्व. प्रतिभा संजय पाटील (पत्नीच्या) स्मरणार्थ श्री संजय अमृत पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने बॅगेचे केले वाटप

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एसएम पाटील
श्री.संजय अमृत पाटील यानी त्यांच्या स्वर्गीय पत्नी सौ प्रतिभा पाटील यांचे स्मरणार्थ आज अंजनविहीरे येथील जि.प.मराठी शाळेतील मुलांना मोफत दफ्तरचे वाटप केले.सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यक्रमात सदा अग्रेसर असलेली ही जोडी भंगवनताने फोडली त्या बाबत ग्रामस्थ बांधवांच्या मनात देखील दुःख आहे परंतु सदविचाराची कास धरणारे आबासाहेब संजय पाटील यांनी स्व. पत्नीच्या आठवणींच्या समरणार्थ चिमुकल्यानां प्रत्येकी दप्तराचे वाटप केले त्याप्रसंगी उपस्थित श्री.पितांबर आप्पा पाटील, अंजनविहिरे सरपंच श्री गणेशकांत आप्पा.उपसरपंच भरत पाटील.सदस्य वामन पाटील.गुलाब बाबा,सेनू पाटील.रविंद्र पाटील, महेश पाटिल मुरलीधर आबासाहेब. बारकू पा.खंडेराव आबा. निबा बापू, प्रभाकर पा.नितीन पा.सुरेश पाटील, भिकन भाऊ साळुंखे,श्रीधर दोडे,भैय्या पाटिल.आदी ग्रामस्थ उपस्थित होते जिल्हा परिषद मराठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद हजर होते मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदाणे दाते श्री आबासाहेब संजय पाटील यांचे आभार मानलेत आपल्या परिजनांची आठवण म्हणून असे उपक्रम कायम शाळेत व्हावेत याही भावना त्यांनी व्यक्त केल्यात