फेसकाम नियामक मंडळाच्या नेरूळ मुंबई येथे झालेल्या सभेत सेंटर कौन्सिल सीसी म्हणून खान्देश प्रादेशिक विभाग धुळेचे अध्यक्ष बी. एन. पाटील यांची निवड

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील फेसकाम खानदेश प्रादेशिक विभाग धुळेचे अध्यक्ष प्राचार्य श्री बी एन पाटील यांची दि.22-7-2025 रोजी झालेल्या फेस्काम नियामक मंडळाच्या सभेत आईस्कान मध्ये सेंट्रल कौन्सिल..सी.सी. म्हणून निवड झाली. त्याप्रसंगी आईस्कान चे माजी अध्यक्ष श्री चापके साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी फेस्कामचे अध्यक्ष श्री आण्णासाहेब टेकाळे, माजी अध्यक्ष श्री अरुण रोडे साहेब, मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी व मनोहारी मनोयुवा चे संपादक श्री बाळकृष्ण वाणी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य श्री बी एन पाटील यांच्या निवडीचे पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर अध्यक्ष शिवाजीराव पाटील सचिव आप्पासाहेब एस एम पाटील व सर्व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केलं आहे सर्व स्तरातून बी एन पाटील साहेबांचे अभिनंदन होत आहे