श्रेयस पतसंस्थेची सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थी गुणगौरव सोहळा.

श्रेयस पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त सामाजिक बांधिलकीतून निबंध स्पर्धा,नृत्य स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, व विद्यार्थी गुणगौरव सोहळा नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव या ठिकाणी संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश मदने व संचालक मंडळ यांच्या हस्ते 73 गुणवंत विद्यार्थी व स्पर्धेतील 18 विजयी विद्यार्थी यांना गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश मदने यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की कार्यसम्राट आमदार कै. मा. लक्ष्मण भाऊ पांडुरंग जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संस्थेने गेल्या दहा वर्षापासून विद्यार्थी गुणगौरव सोहळा, दुष्काळग्रस्तांना मदत,वारकऱ्यांना जेवण वाटप,ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप,अंध अपंग मुलांना शालेय वस्तूंचे वाटप, जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा,वृक्षरोपण,रक्तदान शिबिरे व महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम असे उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे सांगितले. संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त विशेष उपस्थिती म्हणून सा.का. अजय दूधभाते , श्रमजीवी पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत गोफणे, जनहित पतसंस्थेचे अध्यक्ष मधूकर त्रिभुवन पुणे पीपल बँकेचे व्यवस्थापक,श्री अंगद शेवाळे औंध गाव पतसंस्थेचे संचालक श्री बबन मदने, रायगड दर्शन पतसंस्थेचे संचालक रमेश सपकाळ,, श्री गजानन मोरे कोकण भूषण पतसंस्थेचे खजिनदार व श्री गणेश ढोरे मंडल अधिकारी सांगवी हे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संस्थेच्या व्यवस्थापिका सौ सारिका कुलकर्णी यांनी मानले .सुत्रसंचालन संदिप कापसे यांनी केले.