ताज्या घडामोडी

सांगलीच्या विक्रम यादव यांना झारखंड येथील रोटी ब्लड युथ कल्बचा राष्ट्रीय पुरस्कार

बॉम्बे ब्लड ग्रुप रूग्णांसाठी मसिहा

झारखंड मधील धनबाद मध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान समारोहात राष्ट्रीय अँवार्ड होत आहेत. त्या अँवार्ड मध्ये सांगली च्या बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनाईजर, इंडीया संस्थापक अध्यक्ष श्री.विक्रम विश्रांत यादव तासगांव
यांना नैशनल अँवार्ड सन्मानीत केले जाणार आहे. देशातील सात रक्तदानाशी निगडीत कामकरणा-या संस्थामध्ये बॉम्बे बल्ड ग्रुपला हा प्राधान्य दिले आहे.

ऑल इंडीयामध्ये दुर्मिळ रक्तगट व इंतर ब्लड ग्रुप गरजु रूग्णापर्यन्त देणेचे काम या ग्रुपच्या वतिने केले जाते.

असे या जो रक्तगट रक्त मिळत नसेल तर ज्या भागात रक्त मिळत नाही त्या राज्यात रक्तदाते जावून रक्तदान करून ते रक्तदाते परत येतात
बॉम्बे ब्लड ग्रुप चे रक्तदाते हे पदरमोंड करून अनेक राज्यात जावून रक्तदान करून ते परत सांगली मध्ये येत असतात. बॉम्बे ब्लड ग्रुप च्या माध्यमातून आज अखेर दिल्ली , झारखंड, वेस्ट बंगाल,नेपाळ,आगरा , हिमाचल प्रदेश, केरळ, हैद्राबाद, नागपुर, जम्मू, कर्नाटक, युपी, बिहार अशा अनेक ठिकाणी जाऊन रक्तदान करून रक्तदाते येत असतात. तर जगातील सर्वांत दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप हा भारतात १८० व जगात २४० रक्तदाते चा रक्तगट असून ह्या रक्तगटाचे सांगली, तासगांव चे विक्रम विश्रांत यादव यांनी आज अखेर अनेक राज्यात जावून ६९ वेळा रक्तदान केले आहे. यादव यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यातून बॉम्बे ब्लड ग्रुप चे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??