ताज्या घडामोडी

अशोक भोईटे यांनी शिक्षणासाठी दिलेले समर्पण परिसरांमध्ये प्रेरणादायी.- रणधीर नाईक

शिराळा प्रतिनिधी

शिवकेदार विद्यालय कांदे ता. शिराळा येथील शिक्षक अशोक भोईटे (सर ) हे 36वर्ष्याच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यांचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

नाईक पुढे म्हणाले, शिराळा तालुक्यामध्ये एन एम एम एस या शिष्यवृत्ती चे काम आग्रकमाने करण्यामध्ये मोठे सहकार्य भोईटे सरांचे लाभले आहे.शिक्षकी पेशा हा उत्तम पेशा आहे. परंतु, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालामुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. मुलांचे पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतील, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. केवळ शालेय अभ्यासक्रमाचे धडे न देता, मौलिक मूल्यांची, थोर विचारांची रुजवात करण्याचे काम अशोक भोईटे सरांनी केले आहे. या पुढील काळात ही तालुक्यातील सर्व विद्यालया मधील मुलांना शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे असे आव्हान नाईक यांनी केले.

यावेळी माजी सरपंच काशिनाथ पाटील, शिवाजी केन संचालक भोला पाटील, उपसरपंच छन्नू पाटील,मोहन पाटील,निवास पाटील धनाजी पाटील, अनिल पाटील,बाळासाहेब पाटील,विश्वास पाटील, राजेंद्र पाटील,आनंदा जाधव विलास भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??