ताज्या घडामोडी

शहापूरच्या गौरेश्वर महादेव मंदिरला 31 फुटांची त्रिशूल मरणोत्तर दान करून गीता प्रवचनकार,कै हभप पिरन बापूंच्या दातृत्वाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील  बापूंच्या प्रेरणादायी कर्तुत्वाला त्रिवार साष्टांग अभिवादन!!
कै पिरन बापूंनी केलेल्या या कार्याला संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांच्या मनात कायमस्वरूपी आठवण तेजोमय राहील बापूंच्या पुढे वारसा कोणीच नव्हतं स्वर्गवास होण्याच्या अगोदर त्यांनी गावातील काही मंडळींच्या कानी सांगून ठेवलं होतं की माझी गौरेश्वर महादेवाला त्रिशूल दान करायची ई च्छा आहे नंतर काही दिवसातच त्यांना भगवंताने आपलेस केल त्यांच्या बँक खात्यावर शिल्लक तीन लाख रुपये होते ज्यांच्या कानी मंदिराला त्रिशूल दान करण्याबाबत कै हभप पिरण बापू बोलले होते त्यांनी दीड लाख रुपये उत्तर कार्यासाठी खर्च केले आणि दीड लाखात त्रिशूल आणून गौरेश्वर महादेव या मंदिरास ह भ प कै पिरण भोमा पाटील यांचे नावे दान केले द ह भ प कै पिरण बापू हे गीता शास्त्राचे प्रवचनकार होते त्यांचे अनेक ठिकाणी पंचक्रोशीत प्रवचने होत होती गृहस्थी जीवनाचा त्याग करून त्यांनी संन्याशी जीवनात व्रत धारण करून त्यांचं जीवन जगले अशा या महर्षी तपस्वी बापूंना इगल न्यूज व गौरेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने तसेच शहापूर गावकऱ्यांच्या वतीने मरणोत्तर मानवंदना!

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??