शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय कामेरी येथे इयत्ता पाचवी ते आठवी विद्यार्थी शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न

इस्लामपूर /प्रतिनिधी
शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी.एल. चरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णात पाटील ,सदस्य जयदीप जाधव,संताजी बाबर,मुनीर मुल्ला,दत्तात्रय पाटील,संजय पाटील,सौ.शीतल पाटील,सौ.सुनिता कापसे , सौ.श्वेता पानसकर,सौ.पूजा जाधव यांच्या उपस्थितीत सहविचार सभा घेण्यात आली . या सह विचार सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी पर्यवेक्षक यू.बी जाधव हे होते
प्रारंभी ज्येष्ठशिक्षिका एस.आर.यादव. यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
या सहविचार सभेत घटक चाचणी एक निकाल , एन एम एम एस परीक्षा , अभ्यासक्रम , घेण्यात आलेल्या एन एम एम एस
17 चाचणी परीक्षा पाचवी शिष्यवृत्ती 20 चाचणी परीक्षा त्यांचा निकाल उपस्थित पालकांना दाखवण्यात आला. विद्यार्थी गुणवत्ता वाढ होण्यासाठी विद्यालयाच्या वतीने राबविले जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली रविवार सह दररोज पाचवी, आठवी शिष्यवृत्ती व एन एम एम एस परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे जादा तास घेतले जातात याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद थोडा कमी असतो हे गृहीत धरून पालकांकडून तासाची वेळ थोडी बदलणे बाबत सूचना आली त्यानुसार रविवार 14 पासून इयत्ता पाचवीचा तास सकाळी 8.30 व आठवीचा तास सकाळी 9.30 वाजता घेण्याची ठरले.
आज पालकांच्या बरोबर अतिशय उत्तमरीत्या सुसंवाद साधण्यात आला. शाळेच्या भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी शिक्षक व पालक एकमेकास सहकार्य करण्यास कटिबद्ध आहेत अशी चर्चा झाली. पालकां च्याकडून आलेल्या सूचनांची दखल घेऊन या पुढील काळात शिक्षकांकडून योग्य ते प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रभारी पर्यवेक्षक यू.बी. जाधव यांनी दिली
यावेळी पालकांकडून प्रामुख्याने
विद्यार्थ्यांना दररोज अभ्यास दिला जावा व तो दुसऱ्या दिवशी तपासण्यात यावा अशी सूचना मांडण्यात आली. यावेळी इयत्ता 5 ते 8 चे वर्गशिक्षक डी.बी. पाटोळे, सविता जानकर किरण पवार,सौ. एस एम पाटील उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.एम.पाटील यांनी केले.डी.बी.पाटोळे यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीचे माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र जेडगे व सर्जेराव जगताप यांनी संयोजन केले.