चेंबूर येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

आपण संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज आहोत हे आपले भाग्य असून त्यांच्या विचाराप्रमाणे कामातच देव पाहिला पाहिजे “* असे प्रतिपादन मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश संतोष माळी यांनी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोसायटी हॉल,शास्त्रीनगर,वाशी नाका,चेंबूर येथे खान्देश मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात केले.संतांचा सन्मान करणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.प्रकाश संतोष माळी व प्रा.सुनिल भाऊलाल महाजन,कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रामकृष्ण महाजन तसेच विशेष अतिथी अमर पाल भाई व बापू नथ्थू माळी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली.छबुलाल गणपत माळी यांनी सावता महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यावेळी माळी समाजातील बंधू-भगिनींसोबत इतर समाजातील बंधू-भगिनींनी देखील संत सावता महाराज यांना आदरांजली वाहिली.यावेळी प्रा.डॉ.प्रकाश संतोष माळी,प्रा.सुनिल भाऊलाल महाजन,भगवान दयाराम महाजन,ऍड.राहुल पाटील यांनी संत सावता महाराजांविषयी विचार व्यक्त केले.सौ.रत्ना जगन्नाथ माळी यांनी अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कु.मानसी जितेंद्र माळी,कु.मनस्वी जितेंद्र माळी व कु.तेजल चुनिलाल महाजन या छोट्या मुलींनी सावतोबांविषयी सादर केलेले विचार कौतुकास्पद ठरले.या सर्व मुलींचे प्रा.डॉ.प्रकाश संतोष माळी यांनी रोख बक्षिसे देऊन कौतुक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रामकृष्ण महाजन यांनी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन शशिकांत मोतीलाल महाजन व आभार प्रदर्शन सुरेश पंडीत लोखंडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप भोजू महाजन,वसंत नथ्थू माळी,सुरेश पंडीत लोखंडे,जगन्नाथ दयाराम माळी,शशिकांत मोतीलाल महाजन,प्रकाश आनंदा महाजन,ज्ञानेश्वर छबुलाल माळी,जितेंद्र छबुलाल माळी,रविंद्र छबुलाल माळी,चुनिलाल गोकुळ महाजन,विक्रम भगवान महाजन,विजय रामकृष्ण महाजन व भूषण नामदेव महाजन यांच्यासह सर्व युवक,युवती व भगिनींनी विशेष मेहनत घेतली.