शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी: आ. सत्यजित देशमुख

(भागाईवाडी येथे बांबू काडी निर्मित अगरबत्ती प्रकल्पाचे उद्घाटन)
कोकरूड / प्रतापराव शिंदे
शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. ते भागाईवाडी ता. शिराळा येथे लिनो ग्रीन गोल्ड कंपनी संचलित श्रीगंध बांबू अगरबत्ती उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी ज्ञान गंगा एज्युकेशनचे संस्थापक बी. डी. पाटील,कोल्हापूर कृषी संचालक बसवराज मास्तोळी, तहसीलदार शामला खोत-पाटील,कृषी अधिकारी किरण पवार , बांबू सोसायटीचे अरुण वांद्रे , सह संचालिका अनुराधा काशिद यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना देशमुख पुढे म्हणाले की, बांबू पासून अनेक वस्तू बनविल्या जात असून शासनाकडून ही बांबू लागवड साठी प्रोत्साहन दिले जात आहे. शिराळा तालुक्यात फक्त १० हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड असून येथील शेतकऱ्यांना बांबू क्षेत्रात संधी आहे. भागाईवाडी येथील श्रीगंध अगरबत्ती प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील महिला, पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, संचालिका रंजना पाटील, कंपनीच्या संस्थापिका अनिता पाटील – मोरे , व्यवस्थापक अमित मोरे, सुरज पाटील, सागावचे चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, सत्यजित पाटील, भागाईवाडी येथील हिंदूराव पाटील, अरुण पाटील, प्रसाद पाटील, निवृत्ती पाटील, अनुराधा काशिद, दिपक सुवेॅ, रोहित शिंदे , प्रल्हाद पाटील आदींसह शिराळा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकरी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. बी. हिवाळे, प्रास्ताविक अरुण वांद्रे तर आभार पुजा म्हात्रे यांनी मानले. भागाईवाडी येथे बांबू काडी निर्मित श्रीगंध अगरबत्ती प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना आ. सत्यजित देशमुख, शेजारी बी. डी. पाटील, शामला खोत- पाटील, अमित मोरे, बसवराज मात्सोळी, किरण पवार आदी.