मुलींच्या क्रिकेटच्या संघाने नुकत्याच झालेल्या शालेय रत्नागिरी जिल्ह्याच्या सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धेमध्ये दापोली तालुक्यातील वराडकर बेलोसे ज्यू.कॉलेजच्या संघावर 19 धावांनी विजय

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे ता.रत्नागिरी संचलित माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ (विज्ञान /वाणिज्य)महाविद्यालय वाटद खंडाळा येथील 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेटच्या संघाने नुकत्याच झालेल्या शालेय रत्नागिरी जिल्ह्याच्या सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धेमध्ये दापोली तालुक्यातील वराडकर बेलोसे ज्यू.कॉलेजच्या संघावर 19 धावांनी विजय मिळवून कोल्हापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली निवड निश्चित केली आहे.खंडाळा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 2 गडी बाद 43 धावा केल्या.यामध्ये सलामीची मनाली नंबरे 9 धावा व सानिया महाकाळ 9 धावा यांनी 18 धावांची सलामी देऊन त्या बाद झाल्या.तर सानिका आलीम नाबाद 12 धावा व पूजा जाधव हिने नाबाद 7 आणि अवांतर 6 धावा मिळाल्या.दापोली संघाला जिंकण्यासाठी 44 धावांचे आव्हान पेलवले नाही.खंडाळा संघाच्या भेदक गोलंदाची समोर दापोली संघाला 4 गडी बाद 24 धावाच करता आल्या.मनाली निंबरे,सानिया महाकाळ,निधी डाफळे,पूजा जाधव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.जिल्ह्यातील आपली गेली 25 वर्षाची विजयी परंपरा कायम राखून या स्पर्धेवर आपले वर्चस्व राखले.उत्तम क्षेत्रक्षण,फलंदाजी व उत्कृष्ट गोलंदाजीचे या संघाने प्रदर्शन केले. या संघामध्ये मनाली निंबरे,सानिया महाकाळ,सानिका आलीम,पूजा जाधव, जयश्री शितप,निधी डाफळे,दिशा डाफळे, सिद्धी केसरकर,तन्वी सावंत,रिया पावस्कर ,आश्लेषा लोकरे,रुताली रामाने,सलोनी कुरटे,ईश्वरी ढवळे, मृणाली बलेकर,साक्षी खापले, हे खेळाडू होते तर या संघाला क्रीडा शिक्षक डॉ.राजेश जाधव,पल्लवी बोरकर यांनी मार्गदर्शन केले.विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे,उपाध्यक्ष रामनाथशेठ आडाव, सचिव समीरशेठ बोरकर, मा.सुभाषराव विचारे,संदीप सुर्वे, दिवाकर जोशी, तुषारशेठ चव्हाण, किशोर मोहित,अनिकेत सुर्वे यांनी संघाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


