पलूस येथील बंद घरातील कुलूप उघडून चोरी करणाऱ्यास पलूस पोलिसांनी केले जेरबंद

प्रतिनिधी : – बापूसाहेब कांबळे
एकूण चार लाख किंमतीचे ऐवज हस्तगत.
मा. पोलीस अधीक्षक सो श्री. संदीप घुगे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव श्री. सचिन थोरबोले सो, यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाणे हद्दीतील घर फोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत सूचना दिल्या होत्या.
वरील विवरण प्रमाणे दिनांक 18/07 /2025 ते 21/07/2025 फिर्यादी अरविंद श्रीमंत यमगर रा. पलूस हे परांजपे कॉलनी येथील स्वतःच्या प्लॉटला कुलूप लावून गावी सुट्टीला गेले असता, दरम्याच्या काळात कोणी तरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे बंद घराचे कुलूप उघडून फिर्यादी यांचे संमती शिवाय घरात प्रवेश करुन घरातील वरील वर्नाचे सोने व रोख रक्कम चोरून नेले बाबत पलूस पोलीस ठाणे गुरंन 116/2025 भादवि 305.
( अ ) प्रमाणे घरफोडी झालेबाबत गुन्हा दाखल झालेने पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील पलूस पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे कामी पलूस पोलीस पथकास योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील पथकाने गोपनीय बातमीदार आधारे माहिती प्राप्त झाली कि, संशयित नामे कांचन बाबुराव कुंभार रा. वाझर, ता. खानापूर, जि. सांगली, हिने सदरची चोरी केली आहे.
त्या प्रमाणे सदर संशयितेस पलूस पोलीस ठाणेकडील पथकाने ताब्यात घेऊन तिच्याकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने तपास केला असता सुरवातीला उडवा – उडवीची उत्तरे दिली, त्यानंतर पोलीस खाक्या दाखविली असता वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यांची कबुली दिली असून, तिच्याकडुन गुन्ह्यात चोरीस गेला मुद्देमाल एक सोन्याचे काळ्या मन्यात ओवलेले मनी मंगळसूत्र चार तोळे वजनाचे व 50,000 रुपये रोख रक्कम असे 400000( चार लाख ) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार / नितीन यादव हे करीत आहेत.