ताज्या घडामोडी

पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे सभेत प्रमुख पाहुणे म्हणून माधवबागचे डॉ अनुप महाजन यांचे मार्गदर्शन

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील *पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे सभेत प्रमुख पाहुणे म्हणून माधवबागचे डॉ अनुप महाजन यांचे मार्गदर्शन* साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे मासिक सभा उत्साहात संपन्न झाली पूज्य सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर मासिक सभेत अध्यक्षस्थानी प्रा शिवाजीराव पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माधवबागचे हेड डॉक्टर अनुप महाजन होते कार्यक्रमात प्रथम साने गुरुजींच्या प्रतीमेस पुजन करून प्रमुख पाहुणे श्री अनुप महाजन, अध्यक्ष ,सचिव व कार्यकारणीच्या हस्ते दीप प्रजवलन करण्यात आले नंतर ज्यांचे वाढदिवस होते त्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मंडळास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री डॉक्टर अनुप महाजन यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार अण्णासाहेब शिवाजीराव पाटील यांनी केले माधवबागचे अमळनेर येथे सेंटर असून त्या सेंटरला पंचकर्म हृदयविकार वातविकार ,स्त्री रोग चिकित्सा, पोटाचे विकार याबाबत चिकित्सा करण्यात येते शिबिर देखील आयोजन करण्यात येते वरील आजारांच्या बाबतीत डॉक्टर अनुप महाजन यांनी सुमारे एक तासाच्या वर मार्गदर्शन केले व सर्व ज्येष्ठांच्या शंकांचे निरसन देखील केले त्याचबरोबर अण्णासाहेब शिवाजीराव पाटील अध्यक्ष यांनी देखील त्यांच्या शैलीत ज्येष्ठ नागरिकांना समजेल असं मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ,सचिव आप्पासो शिवाजीराव मोहन पाटील , उपाद्यक्ष उमाकांत नाईक , अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ,श्रावण पाटील डी व्ही बिरारी, एस पी पाटील व सर्व कार्यकारिणी सदस्य हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंडळाचे सचिव एस एम पाटील यांनी केले तर श्रावण पाटील प्रार्थना गायन केले पसायदान प्रा सोनवणे यांनी गायन केले नाश्ता सर्वांनी घेतला आभार एस एम पाटील यांनी मानले कार्यक्रमास अनेक मान्यवर महिला भगिनी हजर होते

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??