माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन समारंभ…..

प्रतिनिधी : – बापूसाहेब कांबळे
माजी आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन सभारंभ संपन्न झाले. त्यामध्ये आत्मा विठू मळ्याकडे जाणारा रस्ता (8.50 लाख), बी. के. पाटील मळा रस्ता (1 कोटी 44 लाख) या रस्त्याचे उद्घाटन व दिव्यांग लोकांना पाच टक्के ग्रामनिधीतून धनादेशाचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष श्री. मानसिंगभाऊ यांनी बहे रस्त्याचीही पाहणी केली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील प्रमुख उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष श्री. नाईक यांनी यानिमित्ताने मनोगत व्यक्त केले. माजी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांनी स्वागत केले. सरपंच संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. पंडित माने यांची शिराळा विधानसभा क्षेत्रातील स्वराज्य कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी तर, शुभांगी पाटील यांची सांगली जिल्हा स्वराज्य कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी प. स. सदस्य सुभाष पाटील, उपसरपंच शैलजा पाटील, दिलीप पाटील, माजी सरपंच छायाताई रोकडे, महेश पाटील, डी. आर. पाटील, हेमंत पाटील, राजेंद्र गावडे, जे. बी. पाटील, दिनकर मोकाशी, वसंत पाटील, अवधूत कुलकर्णी, विठ्ठल दळवी, बाबासाहेब पाटील, राजेंद्र गावडे, राजेंद्र नायकवडी-पाटील, खंडू गडाळे, माणिकराव पाटील, नारायण रोकडे, रवींद्र जमदाडे, अशोक पाटील, विठू पाटील, शरद बल्लाळ, अनिल साळुंखे, अमित पाटील, बिट्टू कदम, विकास माने, महादेव माने, साहेबराव माने, कृष्णाजी माने, माणिक पाटील, अमर शिंदे, शिरीष पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सिराज अत्तार आदी मान्यवर व नेर्ले ग्रामस्थ उपस्थिती लावली. माजी उपसरपंच मनीषा माने यांनी आभार मानले.