ताज्या घडामोडी

शिराळासारख्या डोंगराळ भागातील महिलांना प्रगती प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न – आमदार मानसिंगराव नाईक

Spread the love

शिराळा (प्रतिनिधी)

शिराळा सारख्या डोंगराळ भागातील सर्व महिलांना प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व वैयक्तीक पातळीवर सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
येथील रसिका मल्टीपरपस हॉलमध्ये सखी मंच शिराळा मार्फत झालेल्या ‘जल्लोष 2022’ कार्यक्रमाची सांगता व महिला सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधील सोडतीमधून विजेत्या ठरलेल्या महिलांना बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक होत्या.
आमदार नाईक म्हणाले, सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी व महिलांच्या प्रगतीसाठी झटणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्रजी पवारसाहेबांनी महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. शिराळा तालुक्यातही सातत्याने महिलांना प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणले जात आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळी व्यासपीठे निर्माण केली जात आहेत. सखी मंचच्या माध्यमातून महिलांना एक सक्षम व्यासपीठ मिळाले आहे.
प्रारंभी मंचच्या व शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष साधना पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. प्रमुख पाहुणे आमदार मानसिंगभाऊ व मान्यवरांचा सत्कार झाला. सखी मंच सदस्यांसाठी घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधून कांदेच्या अश्विनी पाटील, कापरीच्या पद्मजा पाटील व मांगल्याच्या मनीषा शिंदे सोन्याची नथीच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या. तुषार एन्ट्ररप्रायजेस शिराळा मार्फत दिलेल्या शिलाई यंत्राच्या मानकरी नाटोलीच्या सुशीला गणपती निंबाळकर विजेत्या ठरल्या. सर्व विजेत्यांना आमदार नाईक व आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी रंजनाताई नाईक, सौ मनिषाताई नाईक, जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, दीपाली नाईक, शुभलक्ष्मी नाईक, मृणाल नाईक, डॉ. मीनाक्षी पाटील, सुनंदा सोनटक्के, वैशाली कदम, अर्चना कदम, स्मिता महिंद, वंदना यादव, कल्पना गायकवाड, शुभांगी देसाई, रुपाली कदम, डॉ. मनिषा यादव, प्रा. शैलजा काकडे, वैशाली भुयेकर, नुतन साठे, सुप्रीया पाटील, शिल्पा खुर्द, डॉ. शिल्पा कुरणे आदी मान्यवर व सुमारे दिड हजार महिला सदस्यांच्या उपस्थिती होती. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!