ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , मा.आ. धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेत के.जी.जी. स्कूल हाळम सर्वप्रथम

परळी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार , परळी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताहात स्पर्धेत के जी जी स्कूल हाळम या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये “सेवा सप्ताह”अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये ग्रामीण भागातील गटा मधून , दयाधर्म सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष,युवा नेते माधव मुंडे सर यांच्या असलेल्या के जी जी स्कूल हाळम या शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकरी थीम सादर करून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला या यशासाठी अथक परिश्रम करणारे सर्व स्टाफ आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख चव्हाण मॅडम ज्ञानेश्वरी फड,पिपळे सर, मॅडम, संजय फड सर,संदीप ओटले सर, वर्मा सर, करुणा मॅडम,आरती फड मॅडम, गंगा सर,सावित्री मॅडम तेजश्री मॅडम,कराड मॅडम,श्री हाके ,सचिन भताने,व सर्व स्टाफनी मेहनत घेऊन हे यश संपादन केले यासाठी सर्वत्र स्तरातून विद्यार्थी व शाळेचे अभिनंदन होत आहे.

“ओ साहेब,भाऊंना सांगा की दादा त्याचं खूप ऐकतात…”!
या सादरीकरणाच्या वेळी कु. कीर्ती फड या मुलीने उपस्थित त्यांना वरील डायलॉग बोलून खताचे भाव व सातबारा कोरा करण्याची विनंती उपस्थित नेत्यांच्या समोर आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांना केली…!
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आकडे लक्ष देऊन केजीजी स्कूल कार्यरत आहे या शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.!

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??