ताज्या घडामोडी

कांदिवली येथे दिवाळी पहाट चा रंगतदार कार्यक्रम संपन्न

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
कांदिवली पश्चिम येथे दिवाळी पहाट चा रंगतदार कार्यक्रम संपन्न झाला.मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर २०२६ दिपावली सणानिमित्त सकाळी ६ ते सकाळी ११वाजेपर्यंत शैलजा गिरकर फाऊंडेशन आणि श्री दत्त कृपा संगीत विद्या प्रसारक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय,उप शास्त्रीय, नाट्य, अभंग, गौळण अशा विविध गाण्याच्या प्रकाराचा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा गायक राजाराम सुतार अर्थात बाबल गुरुजी यांचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे आयोजन विश्वस्त शैलजा गिरकर फाऊंडेशन च्या क्रांती गिरकर कुंदर आणि माजी मंत्री आमदार विजय भाई गिरकर यांनी केले होते,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.शास्त्रीय संगीत कर्नाटकी व हिंदुस्थानी अशा दोन प्रकारात मोडते, शास्त्रीय संगीताची चौकट ही ठरलेली असते, त्याच्या वेगवेगळ्या छटा असतात, यावेळी गायक राजाराम सुतार यांनी माधो पिया बिदेश गयो, गुंतता हे ,हा प्रणय परिमळे, विठ्ठल कानडू बोलू.कानडू म्हणजे कळायला अवघड आहे असा, नामदेवांचा अभंग सण दिवाळी चा आला,देव देखिला देखिला,आम्हा आनंद झाला,सुरत मधुन वाजवितो रुणझुण, अखंड लागले ध्यान,काळ देहाशी आला, संतांनी मृत्यू चा सोहळा केला आहे,हे वर्णन काळ देहाशी आला या अभंगात केले आहे.गायक राजाराम सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवाळी पहाट च्या गाण्याच्या कार्यक्रमात मंत्र मुग्ध केले.या वेळी सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला, भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे, प्रमोद घाग, संजय बाविस्कर, संतोष घाडगे, विजय गवळी, कल्पेश घाग, राधेश्याम गुप्ता यांचे सत्कार करण्यात आले, या प्रसंगी विभागातील आमचे मुंबई प्रतिनिधी पत्रकार भारत कवितके यांनी उपस्थित राहून बातमी संकलन केली.या विभागातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??