ताज्या घडामोडी

कांदिवली चारकोप येथे आमदार योगेश सागर व्दारा दिवाळी पहाट भूपाळी ते भैरवी सुरेल गाण्याचा कार्यक्रम संपन्न

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
कांदिवली चारकोप येथे आमदार योगेश सागर व्दारा दिवाळी पहाट भूपाळी ते भैरवी सुरेल गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.रविवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५:३० ते सकाळी ८:३० वाजेपर्यंत चारकोप येथील ललित बेकरी समोर, भाजपा आमदार योगेश सागर व्दारा सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळी पहाट हा मराठी गाण्यांचा मंत्र मुग्ध करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आमदार योगेश सागर यांचे महाराष्ट्र राज्यातील मराठी कलेवर नितांत प्रेम,गाण्याचे प्रत्येक शब्द न शब्द त्यांच्या ओठावर रेंगाळत असताना दिसून येत होते, मराठी संगीतकार, गीतकार,गायक, यांची मराठी गाणी मराठी माणसाच्या हृदयात विराजमान आहेत.मराठी गाण्यांनी महाराष्ट्र खरोखरच सुजलाम सुफलाम आहे, ग.दि.मा., जगदिश खेबुडकर, शंकर वैद्य, आरती प्रभू, शांता शेळके, वसंत सबनीस, वसंत बापट, बहिणाबाई चौधरी, सुधीर फडके, अजित कडकडे, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, लतादीदी, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुलोचना चव्हाण, वगैरे वगैरे अशा अनेक कलाकारांनी मराठी गाण्यांचे अक्षरशः सोने केले आहे.या दिवाळी पहाट गाण्याच्या कार्यक्रमात अनाथाच्या नाथा तुज नमो, गुरू विण नाही कुणी, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा, प्रविण दवणे यांनी लिहिलेले अजित कडकडे यांनी गायलेले निघालो घेऊन दत्ताची पालखी, रामदास चे काही मनाचे श्लोक, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, सुधीर फडके यांच्या आवाजातील आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, निजरुप दाखवा हो हरी दर्शनास आलो,झाला महार पंढरीनाथ, देवांना ही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, गोकुळात रंग खेळतो हरी, जाऊ नको जाऊ नको कृष्णा, शोधून शिणला जीव देव घावल का?, लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशाली चा गोंधळला उभा राहिला गोंधळी भवानी चा,नदिच्या पल्याड आईचा गोंधळ, विठ्ठल विठ्ठल.., माऊली माऊली ,आम्हा लेकरांची माऊली तू, शिवाजी महाराजांचा पोवाडा, शंकर वैद्य चे गीत अरुण उदय झाला, आणि जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली,देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो देश भक्ती पर गाणी गायली गेली, ओवी, गौळण, पोवाडा, लावणी, अभंग, लोक गीत, अशा विविध प्रकारची गाणी सादर करण्यात आली, प्रेक्षकांनी प्रत्येक गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला, या प्रसंगी आमदार योगेश सागर, आमदार संजय उपाध्याय, माजी मंत्री विजय भाई गिरकर, नगरसेवक व उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे, कमलेश यादव, प्रतिभा गिरकर, निखिल व्यास, नगरसेवक हिमांशू पारेख, नगरसेविका दक्षता कवठणकर, श्रीकांत कवठणकर, योगेश पडवळ, रेश्मा टक्के, गिरीधर साळुंखे, मनिष साळुंखे, गजानन गवत ई, विभागातील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके,सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, या विभागातील नागरिक पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??