ताज्या घडामोडी

रत्नागिरी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग नाईक; सचिवपदी संदीप आखाडे

कार्यकारिणीची पुनर्रचना; नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग साताप्पा नाईक यांची, तर सचिवपदी संदीप आखाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेची सभा २ ऑक्टोबर २०२६ रोजी माध्यमिक पतपेढी, साळवी स्टॉप येथे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या सभेला तालुकाध्यक्ष संजय सुतार, संघटनेचे माजी अध्यक्ष व माध्यमिक पतपेढीचे माजी चेअरमन सी. एस. पाटील उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे माजी सचिव कै.अशोक अलमान सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सभेत वार्षिक मेळाव्याच्या नियोजनासह तालुका कार्यकारिणीच्या पुनर्रचनेवर चर्चा करण्यात आली. संपूर्ण कार्यकारिणीत बदल न करता सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार ग्रामीण कार्याध्यक्षपदी मिलिंद पांडुरंग पालकर, शहर कार्याध्यक्षपदी रमेश ढोले, उपाध्यक्षपदी आर व्ही पाटील, संदीप जंगम, खतीब मुजक्किर मुमतोजोद्दिन व अक्षय नाईक, तर सहसचिवपदी मारुती गलांडे, राजेंद्र बलेकर, इम्तियाज सिद्धिकी पंडित राठोड व सुनील गवरे यांची निवड करण्यात आली.संघटनेचा विस्तार व कार्य अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने शहर व ग्रामीण विभागांसाठी नवीन संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये दिनेश नाचणकर, एस् एस् गोडसे, धनाजी वाघमोडे, दतात्रय मारुती वीरकर, माधव क्षीरसागर, नितीन वळवी, विनोद पेढे, नितीन जाधव, अ के मगदूम, रमेश काटकर, बोले, महाकाळ,तसेच महिला प्रतिनिधी मुन्नवर तांबोळी ( प्रमुख ), राजश्री पाटील, नलोफर सोलकर, राजमिरा सोलकर, फरकत मिरकर, संजना तारी, शितल सामंत, रूपाली सावंत, पल्लवी बोरकर, श्रेया चिले यांची निवड करण्यात आली. उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये संघटनेचे कार्य पोहोचविण्यासाठी स्वतंत्र उर्दू शाळा संघटक नेमण्यात आले. त्यामध्ये तन्वीर अहमद मुसा बागलकोट, मोस्सीन शेख, झुबेर बीजापूरी, सैफन चरके, सुलताना समीर भाटकर, सुम्मया जुवाले यांची निवड करण्यात आली. केशव दशरथ खाडे यांची राज्य प्रतिनिधीपदी, तर रामदास पांडुरंग पाटील यांची जिल्हा प्रतिनिधीपदी निवड करण्यात आली. नवीन कार्यकर्त्यांना संघटक म्हणून संधी देण्याबरोबरच शहर विभागातून योगेश मोरबाळे व ग्रामीण विभागातून अभिजीत जोशी यांची अर्थव्यवहार निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या सल्लागारपदी श्रीशैल्य पुजारी, सी. एस. पाटील व संजय सुतार यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी एम. बी. कदम यांना कायम ठेवण्यात आले.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष संजय सुतार यांच्या संघटनात्मक कार्याचा गौरव करून त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग नाईक, सचिव संदीप आखाडे व सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. संघटनेचे कार्य अधिक व्यापक, सक्षम व गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सभेचे स्वागत व विषय मांडणी पांडुरंग नाईक यांनी केली, तर आभार नवनिर्वाचित सचिव संदीप आखाडे यांनी मानले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??