उपक्रमशील शिक्षक श्री अरविंद शिवराम महाकाळ यांचा ईगल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय गरुड झेप राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मान

उपक्रमशील शिक्षक श्री अरविंद शिवराम महाकाळ यांना रत्नागिरी जिल्हास्तरीय आदर्श विद्यारत्न पुरस्कार 2026 चा तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे मिळाल्यानंतर ईगल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय गरुड झेप राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मागील अनेक वर्षे शैक्षणिक कार्याची दखल घेऊन 2026 चा पुरस्कार देण्यात आला आहे. श्री महाकाल सर यांनी अध्यापनात नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करून विविध जनजागृती व उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत दोन डोनर, कुटुंब कल्याण योजना, जिल्हास्तरापर्यंत क्रीडा स्पर्धा, इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव,अंध कल्याण निधी अंतर्गत एका व्यक्तीला व्यवसायास सहकार्य दरवर्षी उत्तम शैक्षणिक उठाव, रंगभरण स्पर्धा, विद्यार्थ्यांना मदत ब्लड डोनर.अशा विविध क्षेत्रात विद्यार्थी उपयोगी समाजकार्य व शिक्षणात अमुलाग्र बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.शाळा विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये आदर्श नागरिकत्वाची मूल्य बुजवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून उत्तम साथ मिळाली आहे. तसेच शाळेतील शिक्षक व केंद्रातील शिक्षक यांचे सहकार्य मिळाले आहे. त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्कार मिळवण्यासाठीच्या यशात मदत श्री माधव विश्वनाथ अंकलगे सर यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच बेटातील बीट विस्तार अधिकारी माननीय. श्रीमती. सविता तोटावर मॅडम यांचे सहकार्य लाभले आहे.



