शेतकऱ्यांचा राजा बळीराजा

शेतकऱ्यांचा राजा बळीराजा
दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. शेतकऱ्यांचा राजा बळीराजा. या दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो, अशी भावना आहे. या दिवशी ग्रामीण भागात माता – बहिणी घरातील पुरूषांना ओवाळतांना, ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असे म्हणतात.
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, असे मानतात. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. प्राचीन भारतातील एक अत्यंत असा विख्यात दैत्यराज. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व. सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला सद्गुणी, प्रजाहितदक्ष व सामर्थ्यशाली बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रितीने विभागून देणारा कर्तृत्ववान आदर्श राजा… तो अत्यंत सामर्थ्यशाली असल्यामुळे त्याला नुसते बळी असे न म्हणता महाबळी असे म्हणत असत. महाबलीपुर ही त्याची राजधानी होती.
बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हटले जात असे. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होते. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते. अशा सुखी व संपन्न राज्यावर नेहमीच परकीय आक्रमक वाईट नजर ठेवत असते.
पुराणकथेनुसार हा सप्तचिरंजीवां पैकी एक आहे. विष्णूने वामनावतारात बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवून याला पाताळात गाडले, अशी कथा आहे. युद्धात जिंकता येत नाही म्हणून वामनाने बळीराजाला कूटनीतीने मारले, असे म्हटले जाते. बाहेरून आलेल्या परकीयांनी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकाविले, वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. प्रजा हताश झाली. अशा वेळी बळीच्या शूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देतांना सांगितले की, ‘आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.’ दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा. या दिवशी बळीराजा आपल्या दु:खी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दु:ख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते. म्हणून आज पण घराघरात बलिपूजन केले जाते. आपला राजा वर्षातून एकदा आपल्याला भेटायला येणार म्हणून प्रजा राज्याच्या स्वागतासाठी छान सजावट, रांगोळी व दिवे लावून महाबली राजाचे स्वागत करण्याची पिढीनं पिढ्या चालत आलेली परंपरा आहे.
आजच्या बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. देशात पसरलेले जातीभेद, स्त्री-पुरूष विषमता, आर्थिक शोषण या सर्व गोष्टी नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. अन्याया विरुद्ध संघर्ष करावा लागेल. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करण्याची गरज आहे. इतिहासातील बळीराजा हा आक्रमकांविरोधात लढता लढता मेला. आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणेच मरणे पसंद करू लागला आहे. लढाई सुरू होण्याआधीच तो पराभव मान्य करत आहे. त्याची लढण्याची प्रेरणा हरवली आहे. परंतु आजची तरुण पिढी हे विसरली.
बळी प्रतिपदेचे महत्त्व
राजा बळी यांच्या दानशूर वृत्तीचे स्मरण केले जाते.
सत्य, न्याय, समानता आणि लोककल्याणाचा संदेश दिला जातो.
शेतकरी वर्गासाठी हा सण विशेष आनंदाचा असतो.
व्यापारी वर्गासाठी नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते.
पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
राजा बळी यांचा आदर्श – राजा बळी यांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला काही महत्त्वाचे संदेश देते, सत्ता ही जनतेच्या कल्याणासाठी असावी.
गरीब आणि सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. दानशूरता आणि उदारता हे श्रेष्ठ गुण आहेत.
समाजात सुख, समृद्धी आणि समानता असावी.
*राजा बळी यांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला काही महत्त्वाचे संदेश देते*
* सत्ता ही जनतेच्या कल्याणासाठी असावी.
* गरीब आणि सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे.
* दानशूरता आणि उदारता हे श्रेष्ठ गुण आहेत.
* समाजात सुख, समृद्धी आणि समानता असावी.
महाराष्ट्रातील परंपराराजा बळी यांची आठवण केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्शही समजून घेतला पाहिजे.
*बळीचे राज्य म्हणजे जनतेचे राज्य!* जिथे अन्याय नाही, शोषण नाही, भेदभाव नाही, गरिबी नाही आणि प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे आदर्श राज्य हेच बळीराजाच्या स्मृतीला खरे अभिवादन ठरेल.
*इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो!शेतकरी सुखी होवो, बळीराजाचे स्वप्न साकार होवो!*
समानता, समृद्धी आणि न्याय यांचा संदेश देणारा बळी प्रतिपदेचा सण!
राजा बळींच्या लोककल्याणकारी विचारांना विनम्र अभिवादन!
जनतेच्या कल्याणासाठी असावे राज्य, हीच बळीराजाच्या विचारांची शिकवण!
विशेष संदेश: –
“बळीचे राज्य येवो, शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळो, कष्टकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो आणि समाजात समता, न्याय व बंधुभाव निर्माण होवो!”
माहिती संकलन –
डाॅ.प्रा.सुधीर पंचगल्ले



