ताज्या घडामोडी

जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधत भंडारी फाऊंडेशनच्या मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी, ३ नोव्हें. (वार्ताहर) : भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरीतर्फे जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधत मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रत्नागिरीतील नागरीकांनी पाककृती सादर केल्या. सौ दिपिका दिनेश कुबल या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरी तर्फे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला. मत्स्य पदार्थ पाककला सादर करण्याची संधी यावेळी भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरीतर्फे देण्यात आली होती. स्पर्धकांनी सादर केलेल्या पदार्थांचे परीक्षण तीन परीक्षकांकडून करण्यात आले.

सौ. ऋतुजा अमेय माळवदे यांना द्वितीय तर तृतीय क्रमांक सौ. विणा सागर कासेकर यांनी पटकावला. उत्तेजनार्थ बक्षिसे सोमिल यश प्रसादे, सौ. वैखरी समिर शेटे, कु. मुग्धा शिवाजी कदम, सौ. सांची योगेश पाटील यांनी पटकावले. उत्तेजनार्थमध्ये तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचे गुण सारखे झाल्याने दोघांना बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून माजी नगराध्यक्ष श्री. महेंद्र मयेकर, विशेष अतिथी म्हणून विशेष सरकारी वकील ऍड. पुष्पराज शेट्ये व ज्येष्ठ समाज सेवक साईनाथ नागवेकर हे उपस्थित होते.या स्पर्धेसाठी भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरीचे अध्यक्ष रुपेन्द्र शिवलकर, उपाध्यक्ष पराग भाटकर, अमोल आरेकर, उल्हास लाड, सचिव सुहास धामणसकर, खजिनदार गजानन मयेकर, सहखजिनदार तुळशीदास पाटील, महिला विभागप्रमुख सदस्य सौ. नेहाली नागवेकर व सन्माननीय सदस्य सर्वश्री विनायक भाटकर, सौ. विनया भाटकर, दशरथ रांगणकर, धनंजय चवंडे, गौरव नाखरेकर, चंद्रकांत शेलटकर, दिपक कीर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला.भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरीतर्फे जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधत पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविलेल्या सौ दिपिका दिनेश कुबल यांना गौरविताना माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सोबत ऍड. पुष्पराज शेट्ये व भंडारी फाऊंडेशनचे सदस्य,भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरीतर्फे जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधत पाककला स्पर्धेतील सहभागी स्पर्धक व मान्यवर व भंडारी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??