जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधत भंडारी फाऊंडेशनच्या वतीने २८ ऑक्टो. रोजी पाककला स्पर्धा

रत्नागिरी, ८ ऑक्टो. (वार्ताहर) : भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरीतर्फे जागतिक अन्न दिवस सोहळा बुधवार दिनांक २८/१०/२०२६ रोजी ‘‘गगनगिरी मंगल कार्यालय’’, ८० फुटी हायवेनजीक मांडवी, रत्नागिरी येथे दुपारी २ ते ४ या वेळेत आयोजित केला आहे. तरी भंडारी फाउंडेशन, रत्नागिरीतर्फे, रत्नागिरी तालुक्यातील या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्या स्पर्धकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, जागतिक अन्न दिवस सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून कार्यक्रम यशस्वी करणेस सहकार्य करावे, अशी नम्र विनंती आहे.
जागतिक अन्न दिवस सोहळा निमित्त मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील समस्त सर्व समाजातील स्त्री आणि पुरुष सहभागी होवू शकतात. या स्पर्धेअंंतर्गत प्रत्येक स्पर्धक एकच पदार्थ स्पर्धेसाठी प्रदर्शित करु शकतो. (वेळ दुपारी २ ते सायंकाळी ४ वा.पर्यंत) मत्स्य पदार्थ स्पर्धेसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे त्या पदार्थाच्या कृतीमध्ये मासे अथवा कवचधारी जलचरांचा समावेश असणे बंधनकारक राहिल. स्पर्धकांला दोन पोर्शनमध्ये पदार्थ स्पर्धेसाठी प्रदर्शित करावे लागतील. (एक पोर्शन परीक्षकांसाठी आणि दुसरा पोर्शन स्पर्धेच्या प्रेक्षकांसाठी) स्पर्धेसाठी प्रदर्शित केलेल्या पदार्थांचे तीन परीक्षकांकडून परीक्षण करुन प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशा ५ क्रमांकांना बक्षीसे देण्यात येतील.
स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्यास ३३३३/- द्वितीय विजेत्या स्पर्धकास २२२२/- तृतीय विजेत्या स्पर्धकास ११११/- उत्तेजनार्थ (५) विजेत्या स्पर्धकास रुपये ५००/- चे बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेत भाग घेण्यासाठी दि. २४/१०/२०२६ पर्यंत रु. १५१/- नोंदणी शुल्क भरुन नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रथम नाव नोंदणी करणार्या ४० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्री. रुपेन्द्र शिवलकर ९२८४२३६७९८, श्री. सुहास धामणसकर ९५९५२८२८६०, श्री. पराग भाटकर ९२१५५६६६७, श्री. गजानन मयेकर ९४०३५०९६८०, श्री. अमोल आरेकर ९४२३२९१६८८, श्री. उल्हास लाड ८९९९७११८१८, श्री. भूपेश भाटकर ९२२६१६६१६० सौ. नेहाली नागवेकर ९४०५३४८९९६, श्री. विनायक भाटकर ९०२८७८२९८९, सौ. विनया भाटकर ८७९३३१५०४०, श्री. राजेश पाटील ८२०८८९२३६१, श्री. दशरथ रांगणकर ८२७५२६३६३६. श्री. प्रविण वायंगणकर, श्री. धनंजय चवंडे ९४२२३७५६७३, श्री. अजय पंडये ९४०३५६५२६९, श्री. चंद्रकांत शेलटकर ९४०३३६३३५५,श्री. गौरव नाखरेकर ९४२२३८२८१५, श्री. तुळशीदास पाटील ९४०४३३५२७५, श्री. दिपक कीर ९१५८९९९०७५ यांच्याशी संपर्क साधावा.
एका स्पर्धकाला एका नोंदणीवर एकच पदार्थ प्रदर्शित करता येईल. पाककला कृती स्पर्धेमध्ये मासा अथवा कवचधारी जलचर याचा समावेश नसल्यास प्रदर्शित पदार्थ स्पर्धेतून बाद करण्यात येईल. नोंदणी शुल्क रुपये १५१/- क्युआर कोडच्या माध्यामतून स्पर्धक पाठवू शकतात. स्पर्धकांना संकेत नंबर दिला जाईल तो त्याच्या टेबलवर स्पर्धेदरम्यान प्रदर्शित केला जाईल. स्पर्धकाला आपले नाव टेबलवर स्पर्धेदरम्यान प्रदर्शित करता येणार नाही. स्पर्धेदरम्यान स्पर्धकाने मत्स्य पदार्थाची कृती आणि मत्स्य पदार्थाचे घटक सुवाच्च अक्षरात अथवा टंकलिखित करुन प्रदर्शित करणे अनिवार्य राहिल. परिक्षकांनी दिलेल्या गुणांनुसार स्पर्धेतील विजेता निवडीचे निर्णय अंतिम असतील. स्पर्धेसंदर्भात कोणत्याही विवादाविषयीचे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरी राखून ठेवला आहे. स्पर्धकांनी मत्स्य पदार्थ प्रदर्शन करणे, तसेच परीक्षकांनी परीक्षण करणे, यानंतर बक्षीस वितरणचा कार्यक्रम राहिल. जागतिक अन्न दिवस साजरा करण्यासाठी भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना विनम्र आवाहन करत आहे. या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने हजर राहून लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारी फाऊंडेशन, रत्नागिरी यांने केले आहे.



