कु. अनुभूती बॅनर्जी च्या भरतनाट्यम अरंगेत्रम या नृत्याच्या कार्यक्रमाचे ११ जुलै रोजी आयोजन

कलाधिपती नटराजाच्या असीम कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने, अनुभूती, या आमच्या प्रिय कन्येद्वारे सादर केल्या जाणाऱ्या भरतनाट्यम अरंगेत्रम, अर्थात रंगप्रवेशाच्या कार्यक्रमाकरिता आपल्याला सादर आमंत्रित करीत आहोत. हा कार्यक्रम म्हणजे भरतनाट्यम या परमपवित्र अभिजात नृत्यप्रकारात अनुभूतीने ‘संस्कृती अकॅडमी ऑफ फाईन आर्टस्’ या प्रतिष्ठित संस्थेत घेतलेल्या अनेक वर्षांच्या समर्पित प्रशिक्षणाची सुंदर मंगलमय सांगता आहे. मान्यवर गुरु नाट्याचार्य आशा सुनील कुमार यांच्या प्रेमळ आणि शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या नृत्यपदार्पणाद्वारे ही कृपाभिलाषी शिष्या ईश्वर आणि आपल्या या मान्यवर गुरूंच्या चरणी ही नृत्यसेवा अर्पण करणार आहे.दिनांक : ११ जुलै २०२६ (शनिवार) कार्यक्रमाची वेळ : सकाळी ११ वाजता ,कार्यक्रम स्थळ: गडकरी रंगायतन, ठाणे (पश्चिम) आपण कृपया या मंगलमय कार्यक्रमाला हजर राहून नृत्यकलेद्वारे रंगमंचावर पदार्पण करणाऱ्या या नवजात कलावतीला शुभाशीर्वाद द्यावे आणि तिला प्रोत्साहित करावे, ही नम्र विनंती करीत आहोत. कार्यक्रम ठीक वेळेवर सकाळी ११ वाजता सुरु होईल, आपण वेळेआधीच येऊन सर्वोत्कृष्ट आसनाची निवड करू शकाल. कार्यक्रमस्थळी वॅले पार्किंग उपलब्ध आहे. कार्यक्रम संपल्यावर लगेचच त्याच स्थळी प्रीतिभोजन तयार असेल. आपण त्यात सम्मिलीत व्हावे ही आग्रहाची विनंती..आपले विनीत उज्ज्वल आणि आरती बॅनर्जी.कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत त्यांना आग्रहाची विनंती. आपल्या उपस्थिती विषयी पुढील मोबाईलवर (शक्यतो ६ जुलैपर्यंत) नक्की कळवा, जेणेकरून कार्यक्रमानंतर भोजनाचे आयोजन करणे सुलभ होईल. आपली स्नेहांकित डॉ. मीना श्रीवास्तव मोबाईल क्र. ९९२०१ ६७२११



