
मुरूम, ता. ३ (बातमीदार) : आरोग्यसेवेला समर्पित असलेल्या डॉक्टरांच्या निस्वार्थ कार्याचा गौरव करण्यासाठी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिना’चे औचित्य साधून रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने डॉ. जिरोळे हॉस्पिटलच्या सभागृहात बुधवारी (ता. १) रोजी आयोजित शहरातील विविध डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे नूतन अध्यक्ष कलय्या स्वामी होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, डॉ. नितीन डागा, डॉ. शिवप्रसाद काबरा, सचिव कलाप्पा पाटील, प्रकाश रोडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी धन्वंतरी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. महेश स्वामी, डॉ. महेश जिरोळे, डॉ. वर्षा बिराजदार, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. शिल्पा डागा, डॉ. शिल्पा जिरोळे, डॉ. प्रीती चिलोबा, डॉ. सागर काबरा, डॉ. अनिश डागा, डॉ. वैभव कोरे यांचा शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी कलय्या स्वामी म्हणाले की, डॉक्टरांची सेवा ही रुग्णांसाठी वरदान असते. समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या या कष्टप्रद कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. दरम्यान, शिवशरण वरनाळे, डॉ. नितीन डागा, डॉ. वर्षा बिराजदार, डॉ. शिवप्रसाद काबरा, डॉ. महेश जिरोळे, डॉ. प्रीती चिलोबा, डॉ. सुवर्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी तर सचिव प्रकाश रोडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, सुनील राठोड, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. राजकुमार वाकडे, बाबासाहेब पाटील, प्रा. भूषण पाताळे, संतोष कांबळे, शिवकुमार स्वामी आदींनी पुढाकार घेतला.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील जिरोळे हॉस्पिटलच्या सभागृहात रोटरी क्लबच्या वतीने डॉक्टर डॉक्टर्स डे च्या निमित्ताने शहरातील डॉक्टरांचा सत्कार प्रसंगी मान्यवर व अन्य.



