ताज्या घडामोडी

चोपडा,दि.29(प्रतिनिधी): चोपडा जेष्ठ नागरिक संघाची ३४ वी वार्षिक सभा संपन्न होऊन अध्यक्षपदी श्री जयदेव देशमुख यांची फेर निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदाची माळ श्री. जिजाबराव नेरपगारे यांच्या गळ्यात पडली आहे
ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात काल दि.रविवार २८/६/२०२६ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती त्यात नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे कामकाज पाहून पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्ष जयदेव देशमुख व उपाध्यक्ष जिजाबराव नेरपगारे यांचा ज्येष्ठांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पुढील कालावधीसाठी जोमाने कार्य करण्यासाठी सर्वांनी त्यांना ऊर्जा दिले ह्या प्रसंगी संघाचे अनेक ज्येष्ठ मान्यवर सदस्य उपस्थित होते त्यात
मधुकर बाविस्करआबा, विजय करोडपती , सुभाष गुरुजी, आर. जी. पाटील, राजेंद्र देशमुख, आर. एच. बाविस्कर, अलिझाड सर, भिमराव देशमुख,भगवान देशमुख , साहेबराव गुरुजी, संजय बजाज, सौ. ताराबाई पाटील श्रीमती नलिनी बारोट, सौ.नलिनी देशमुख,पत्रकार यशवंत जडे ,सौ. निर्मला पाटील, अजब राव पाटील, शामराव पाटील, प्रमोद अहिरराव, देविदास धनगर, रवि भदाणे, पत्रकार अनिल पालीवाल, गोविंदराव मराठे , गोकुळ पाटील, विलास पाटील, प्रा. एस. एम. पाटील, देवांग सर, परशुराम पेंढारकर, कवी रमेश जे. पाटील, भालेराव रामकृष्ण माळी, प्रकाश चौधरी, एकनाथ पाटील, अरुण पाटील,प्रकाश देशमुख , राजेंद्र जगताप, शिरसाठ नाना, ताराचंद पाटील, यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. सभेत उपस्थित यांना चहा नास्ता देऊन अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??