ताज्या घडामोडी

भानस हिवरे येथील संकेत शिंदे यांची इंडियन आर्मी मध्ये उच्च पदावर निवड

तालुक्यातील भानस हिवरे येथील अत्यंत गरीब मजुराचा मुलगा संकेत शिंदे याची इंडियन आर्मी मध्ये उच्च पदावर निवड झाली आहे. याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी त्याचा उत्साह पूर्ण वातावरणात सत्कार केला. त्याची वडील राजेंद्र व आई सुरेखा अत्यंत गरीब परिस्थितीत मजुरी करतात. हायस्कूलमध्ये शिकत असताना संकेतने आई-वडिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने केटरिंग चे काम निष्ठेने केले तदनंतर दहावी उत्तीर्ण नंतर आयटीआय मोटर मेकॅनिकल हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीचा शोध घेत असताना नेवासा फाटा येथील समर्पण करिअर अकॅडमी येथे प्रशिक्षण घेतले तदनंतर त्याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाली असून हरियाणा येथे हजर होण्यासाठी आदेश प्राप्त झाले आहे त्याच्या सत्कार समारंभाला म्हणून शिवराय येथील प्रतिष्ठित देविदास साळुंखे, संत ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक प्रसाद पठारे दत्तू भाऊ काळे उपसरपंच अविनाश महाराज महानुभाव पंथ भानस हिवरा माऊली शिरसागर, आजी लताबाई, मामा दही तुले बंडू उगले दत्ता उगले लखन शिंदे व प्रगतशील शेतकरी विश्वनाथ चव्हाण, खेडले काजळी माजी सरपंच सौ निर्मला ताई ढगे पाटील व ग्रामस्थ भानस हिवरे येथील उपस्थित होते

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??