ताज्या घडामोडी

बोरगाव येथील कुमारी आर्या विकास पाटील सीईटी परीक्षेत मिळवले 99% मार्क

बोरगाव तालुका वाळवा येथील कुमारी आर्या विकास पाटील सीईटी परीक्षेत 99% मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मनेराजुरी गावचे द्राक्ष बागायतदार उद्योजक अनिल पवार यांनी आर्या पाटील हिचा सत्कार केला आर्या पाटील ही बोरगाव तालुका वाळवा गावची कन्या असून ती इरिगेशन विभागाचे शासकीय अधिकारी विकास पाटील यांची कन्या आहे तिच्या सीईटीच्या उत्तुंग यशाबद्दल बोरगाव व ईश्वरपूर परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रचंड मेहनत जिद्द अभ्यास करून आर्या पाटील हिने सीईटी परीक्षेत मोठे यश मिळवून उत्तीर्ण झाली आहे सत्काराला उत्तर देताना आर्या पाटील म्हणाली प्रचंड अभ्यास करून आई-वडील भाऊ चुलते चुलते यांच्या प्रेरणें व मार्गदर्शनाने मी हे यश संपादन केले असून भविष्यात मी चांगले यश संपादन करून कुटुंबाचे आई-वडिलांचे नाव उज्वल करेन यावेळी अनिल पवार विकास पाटील प्रदीप पवार उपस्थित होते स्वागत व प्रस्ताविक प्रदीप पवार यांनी केले आभार विकास पाटील यांनी मांडले फोटो आर्या पाटीलचा सत्कार करताना उद्योजक अनिल पवार विकास पाटील प्रदीप पवार व इतर

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??