
महाराष्ट्र शासन परिवहन विभाग,राज्य मराठी विकास संस्था,कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अमराठी भाषिक रिक्षा चालक मालक यांच्यासाठी चला मराठी बोलू या हा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून उल्हासनगरमधील अमराठी भाषिक रिक्षा चालक मालक यांच्यासाठी मराठी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहेत.या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उल्हासनगर-१ येथील सी ब्लॉक गुरुद्वाराच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मा.डॉ.प्रदीप ढवळ व सल्लागार मा.डॉ.ज्योती ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी मा.अरुण आशान सभागृह नेते उमपा व शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख,मा.राजेंद्र चौधरी नगरसेवक व शिवसेना महानगर प्रमुख,मा.राजेंद्रसिंह भुल्लर महाराज जेष्ठ नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख,मा.तिरुपती रेड्डी शिवसेना लोकसभा सचिव,मा.के.डी.तिवारी उत्तर भारतीय शहर संघटक यांच्यासह प्रशिक्षण वर्गाचे आयोजक व रिक्षा युनियनचे अध्यक्ष हरविंदरसिंह (विक्की)भुल्लर,कोकण मराठी साहित्य परिषदेच्या डॉ.समिधा गोरे व प्राचार्या डॉ.हर्षदा लिखिते तसेच *कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा सल्लागार व प्रशिक्षण समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश माळी,* प्रशिक्षण केंद्र प्रमुख प्रल्हाद कोलते,निखिल पाटील व प्रमोद पांडे,प्रशिक्षक प्रमोद पाटील,ईश्वर सपकाळे व राहुल जैन उपस्थित होते.या कार्यक्रमात डॉ.ज्योती ठाकरे,राजेंद्र चौधरी,अरुण आशान व डॉ.प्रदीप ढवळ यांनी उपस्थित रिक्षा चालक मालक यांना प्रशिक्षण वर्गाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशिक्षण समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश माळी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कै.रमाकांत चव्हाण ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मींटी भाई,बब्बूसिंग,दिलीप शुक्ला,राहुल पाल,मधुकर देशमुख,बबलू भालेराव,सुनिल यादव आणि कै.मारुती जाधव रिक्षा चालक मालक संघटनेचे भूषण वैराळकर यांनी विशेष मेहनत घेतली.



