स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई जबरी चोरी, घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद ८ गुन्हे उघड ८,५०,०००/-रु. चा मुद्देमाल हस्तगत.

चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील देवराष्ट्रे गांवी पहाटे ०२ वा चे सुमारास यातील फिर्यादी श्री बाबुराव बलभीम सुतार रा. देवराष्ट्रे यांचे राहते घरात अज्ञात दोन इसमांनी प्रवेश करून फिर्यादी यांची पत्नी, आई व दोन मुलांना कोयत्याचा धाक दाखवुन महिलांच्या गळयातील मणी मंगळसुत्र, बोरमाळ व कर्णफुले जबरदस्तीने काढुन घेतली होती सदर घटनेबाबत चिंचणी वांगी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आजुबाजुचे परीसरात अशा प्रकारचे जबरी चोरीचे गुन्हे घडलेबाबत तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या.सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सहा पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन जबरी चोरी व घरफोडी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचित केले होते.त्या अनुशंगाने दिनांक १८/०६/२०२६ रोजी सहा पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक तासगाव विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांचे पथकाती पोहेकॉ / उदयसिंह माळी यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक संशयीत इसम तासगावमधील पाचवा मैल परीसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सपोनि राजेंद्र यादव यांचे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने पाचवा मैल तासगांव येथे छापा मारून संशयीत आरोपी नामे करण ऊर्फ करंज रज्जा शिंदे वय. १९ वर्षे रा. हुबालवाडी ता. वाळवा जि. सांगली यास ताब्यात घेतले.आरोपीचे केले चौकशी व अंगझडतीमध्ये सोन्याचे दागीणे मिळुन आले ते देवराष्ट्रे व कुंडल परिसरातुन कोयत्याचा धाक दाखवुन चोरी केलेले दागीणे असल्याचे निष्पन्न झाले. नमुद गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या आदेशाने स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करुन आरोपीस नमुद गुन्हयामध्ये अटक करून त्याचेकडे अधिक तपास केला.पोलीस तपासामध्ये आरोपीने त्याचे साथीदारासह जबरी चोरी, घरफोडी व मोटर सायकल चोरीचे ८ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने अनुक्रमे
कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील श्री. झाकीर जमीर मुलाणी. रा. किर्लोस्करवाडी ता. पलुस जि. सांगली यांचे राहते घरात आरोपी व त्याचे साथीदारांनी प्रवेश करून धाक दाखवुन सोन्या चांदीचे दागीणे जबरदस्तीने चोरून नेले होते. पलुस पोलीस ठाणे हद्दीतील सुरैय्या निजाब मुलाणी रा. नागराळे ता. पलुस जि. सांगली यांचे राहते घरात प्रवेश करून त्याचे साथीदारांनी चाकुचा धाक दाखवुन सोन्या चांदीचे दागीणे रोख रक्कम जबरदस्तीने चोरू नेली होती. पलुस पोलीस ठाणे हद्दीतील श्री. अजय रामचंद्र पाटील रा.बुर्ली ता. पलुस जि. सांगली यांचे राहते घरात आरोपी व त्याचे साथीदारांनी प्रवेश करून त्याचे घरफोडी करून सोन्या चांदीचे दागीणे रोख रक्कम चोरून नेली होती. आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील उमेश माणिक नायकवडी रा. वाळवा ता. वाळवा जि. सांगली यांचे राहते आरोपी व त्याचे साथीदारांनी ग्रिलचा दरवाजा उघडुन घरात प्रवेश करून घरफोडी करून सोन्याचे दागीणे चोरून नेले होते.कुरळप पोलीस ठाणे हद्दीतील श्रीमती उषाताई बापु बावचकर रा.वशी ता. वाळवा जि. सांगली यांचे राहते आरोपी व त्याचे साथीदारांनी घराचा दरवाजा उघडुन प्रवेश करून घरफोडी करून सोन्याचे दागीणे चोरून नेले होते.आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील सरदार बादशाह जमादार रा. बहादुरवाडी ता. वाळवा जि. सांगली यांचे राहते आरोपी व त्याचे साथीदारांनी घरफोडी करून सोन्याचे दागीणे चोरून नेले होते. चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील श्री बाबुराव बलभीम सुतार रा. देवराष्ट्रे ता. कडेगांव जि.सांगली यांचे राहते घरात आरोपी व त्याचे साथीदारांनी प्रवेश करून कोयत्याचा धाक दाखवुन सोन्याचे दागीणे जबरदस्तीने चोरून नेले होते. सातारा शहर पोलीस ठाणे जि. सातारा येथुन श्री. संदिप देशमुख यांची चोरीस गेलेली दुचाकी स्प्लेंडर मोटर सायकल आरोपीकडुन हस्तगत करण्यात आली आहे.आरोपी करण शिंदे याने त्याचे इतर साथीदारासह वरील ८ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याचे कब्जातुन गुन्हे करताना वापरलेली चोरीची स्प्लेंडर मोटार सायकल, सोन्याचे ५५ ग्रॅम वजनाचे दागीणे त्यामध्ये मणीमंगळसुत्र, गंठण, बोरमाळ, कर्णफले व अंगठी असा एकुण ८५००००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपी करण शिंदे याचेसोबत वरील ठिकाणी गुन्हे करणा-या इतर पाच साथीदारांची नांवे निष्पन्न करण्यात आली असुन त्यांचा शोध घेत आहोत.आरोपी व त्याचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर सांगली सह बाजुच्या जिल्हयात खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरी व मोका सारखे गुन्हे दाखल आहेत.सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली हे करीत आहेत.



