
प्रतिनिधि – डॉ.सुनिल भावसार
वसमत येथील नामांकित असलेला हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत तब्बल 242 मुलींना आतापर्यंत मोफत पास वाटप करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रवास सुलभ व्हावा यासाठी एसटी बसचा मोफत प्रवास दिला जातो. पाचवी ते बारावीपर्यंत मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो. बहिर्जी विद्यालयामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.पी.जी. शेळके सरांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 242 मुलींना आज मोफत पास वाटप करण्यात आल्या. वसमत येथील आगार प्रमुखांनी या पास साठी मदत केली. या मोफत पास योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींचा आर्थिक भार कमी होईल, मुलींची शाळेतील उपस्थिती वाढेल, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल तसेच मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल. या मोफत पास योजनेचे शालेय पास विभाग प्रमुख श्री. एस.एस.भायेकर सर यांच्या परिश्रमातून अनेक ग्रामीण भागातील मुलींना पास काढून देण्यात येत आहे.
क्रीडाशिक्षक श्री गणपत नरवाडे सर, श्री.डी.एन.पाईकराव सर श्री.लासिनकर सर,
श्री चव्हाण पी.बी सर श्री अमोल भालेराव सर इत्यादी ने सहकार्य लाभले.याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. जी.आर.आरकीलवाड सर, पर्यवेक्षिका श्रीमती एस.व्ही.जाधव मॅडम, पर्यवेक्षक श्री.डी.आर.बागल सर पर्यवेक्षक श्री.के.बी. वायचाळ सर यांची उपस्थिती होती.



