ताज्या घडामोडी

पै. विष्णू नागराळे विद्यामंदिर, नागराळे येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित पै. विष्णू नागराळे विद्यामंदिर, नागराळे येथे दि. 21 जून 2026 रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व शारीरिक व्यायामाची प्रात्यक्षिके सादर केली.

कार्यक्रमास योग प्रशिक्षक श्री. प्रा.शंकर कुंभार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी व आशा सेविका यांनीही विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि नियमित व्यायामाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी नागराळे गावच्या सरपंच, मुख्याध्यापक श्री. शिंदे एस. एस., शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

“योग करा, निरोगी रहा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??