
पालघर जिल्हा प्रतिनिधी, दि. २२ जून :
मेघराज शिक्षण संस्था संचालित विद्यावैभव विद्यालय, केळवारोड येथे शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. २२) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शनिवारी झालेल्या मतदानानंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता होती.
मुख्यमंत्री पदासाठी झालेल्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली होती. या पदासाठी जिनल राठोड, शुभम लोखंडे आणि रिया हाडळ हे उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीत जिनल राठोड हिला १६१ मते मिळून ती प्रचंड मताधिक्याने विजयी झाली.
निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांनी नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी मंत्रिमंडळाची घोषणा करून सर्व पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व पटवून देत जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
निवडून आलेले विद्यार्थी मंत्रिमंडळ
मुख्यमंत्री : जिनल परशुराम राठोड
उपमुख्यमंत्री : शुभम प्रकाश लोखंडे,
रिया रमण हाडळ
शालेय शिक्षणमंत्री : उपासना परेश मोरे
क्रीडा मंत्री : साहिल अनिल मोरे,
तनुष संकेत सुतार
सांस्कृतिक मंत्री : वल्लवि मनोज गडग , दक्ष रविंद्र भोईर
पर्यावरण मंत्री : पूर्वा नरेश गावडे
शिस्त मंत्री : जय महेश चिपाट,
जय राकेश पाटील
जल मंत्री : निरज गणेश पवार
सजावट मंत्री : स्वरा कैलास पाटील,
आर्या संजय वांगड
विद्यालयात लोकशाही मूल्यांची जपणूक व विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या निवडणूक प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



