ताज्या घडामोडी
विश्वास साखर कारखान्याचा बुधवारी रोलर पूजन.

शिराळा प्रतिनिधी
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा सन 2026-27 गळीत हंगामासाठीचा रोलर पूजन समारंभ बुधवार (ता. 24) होणार आहे. ही माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, बुधवारी (ता. 24) सकाळी पावणे दहा वाजता रोलर पूजन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार श्री. मानसिंगराव नाईक व उपाध्यक्ष, माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. या वेळी सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतील.



