जागतिक योग दिन उत्साहात साजरा

पालघर, दि. 21 :
मेघराज शिक्षण संस्था संचालित विद्यावैभव विद्यालय, केळवा रोड येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते तसेच एकाग्रता, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.यानंतर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सतीश घरत व नमिता शेलार यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने करून योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून योगाचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.



