कामेरीत राष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

21 जून 2026 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित डॉक्टर बापूजी साळुंखे विद्यालय व भाग शाळा कामेरी मा. छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूल कामेरी येथे राष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक ॲड.किरण पाटील व आनंदराव पाटील हे प्रमुख उपस्थित होते.यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायाम यांची माहिती देत त्यांची प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगाभ्यास केला. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.प्रारंभी ओंकार प्रतिमेचे पूजन योग प्रशिक्षक व मुख्याध्यापक दिलीप चरणे यांच्या हस्ते व उमेश जाधव, धनाजी पाटोळे इम्रान मुलांनी हर्षवर्धन साळुंखे, सौ धनश्री पाटील ,सौ.किरण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या पूर्वी योगप्रशिक्षक ॲड. किरण पाटील व आनंदराव पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. धनंजय पाटोळे यांनी आभार मानले.



