ताज्या घडामोडी

वारणावती वसाहतीमध्ये गव्यांचा मुक्तसंचार. नागरिकांची सुरक्षा टांगणीला. भीतीचे वातावरण; वन विभागाचे दुर्लक्ष

शिराळा प्रतिनिधी

चांदोली परिसरातील वारणावती वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने अन्न व पाण्याच्या शोधात गवे थेट मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या गंभीर परिस्थितीकडे वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल परिसरात तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे वळत आहेत. वारणावती वसाहतीत तसेच मणदूर परिसरात गव्यांचा मुक्तसंचार सुरू आहे.

गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, ग्रामस्थ, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास नागरिक धास्तावत आहेत. अनेकांनी आपल्या दैनंदिन कामकाजावरही

उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष ?

वन्यजीव आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने यापूर्वी महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तींमध्ये प्रवेश रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता या आदेशांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

गवे रोज वारणावती वसाहतीत तसेच मणदूर गावात येत असल्यामुळे जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. वनविभागाला वारंवार कळवूनही ते कोणतीही ठोस कारवाई करायला तयार नाहीत. एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण?

परिसरातील नागरिकांनी वन विभागाने तातडीने गस्त वाढवून गव्यांना जंगलात परत पाठविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वन विभागाला वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. वन विभागाने तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांनी दिला आहे. इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??