ताज्या घडामोडी

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कोहीनूर..श्री सुर्यकांत तोडकर साहेब

सार्वजनिक जीवनात काम करत असताना काटेकोर, प्रामाणिकपणे आणि नेमके करायचे याचे बाळकडू वडिलांच्याकडून मिळाले. याचा लाभ जीवनभर झाला. डॉ. डी. वाय. पाटील यांचा सर्वात तरुण, विश्वासू, प्रामाणिक सहकारी, सेवक,कार्यकर्ता मॅनेजमेंटमधील ग्रुप मेंबर, आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टचे विश्वस्त व सचिव म्हणून काम करण्याची संधी सुरवातीला मिळाली. वडील गणपतराव शंकरराव तोडकर. वडिलांनी लष्करात आणि त्यानंतर पोलीस सेवेत अधिकारी म्हणून नोकरी केली. त्यांचा आम्हा भावंडांवर खूप प्रभाव होता. आम्ही कसबा बावड्यात रहायला होतो त्यावेळी वडील पोलीस उपअधीक्षक होते. याचाही दबदबा समाजात होता. मी लहानपणापासून सामाजिक वृतीचाअसलेने अभ्यासात मध्यम होतो तितकाच हूड होतो. शिवाय वडिलांचा दबदबा यामुळे बावड्यात काॅलेज जीवनापासून मला सर्वजण ओळखतात.

आमचं मुळ गाव तांदूळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) माझा जन्म झाला आरळे येथे (ता.पन्हाळा). प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर, आरळे, सातवे विद्यामंदीर येथे झाले.कोल्हापूर येथे मेन राजाराम हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. बी. काॅम. शहाजी काॅलेज तर एम. काॅम. काॅमर्स, लॉ ची दोन वर्ष शहाजी लॉ काॅलेजमध्ये झाले. वडील लष्करात नोकरीला होते. भारत-चीन युध्दात वडिलांनी शौर्य दाखविल्यामुळे त्यांना युद्ध सेवा पदक मिळाले. लष्कराच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले.त्यांचा पोलीस दलात त्यांच्या कर्तृत्वामुळे विशेष दरारा होता.पोलीस उपअधीक्षक म्हणून 34 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले.

क्रिकेट आणि फुटबॉल खेळाची खूप आवड. लहानपणी गल्लीत क्रिकेट, फुटबॉल खेळत होतो. काॅलेजला गेल्यावर कसबा बावडा येथील पॅव्हेलियनवर सराव करत होतो. मैदानावर अनेक सामने खेळलो.

कोल्हापूर -कसबा बावड्यात एक कार्यकर्ता म्हणून श्री. गणेशपूजा मित्र मंडळाच्या स्थापना करून त्या माध्यमातून सार्वजनिक काम चालू असलेने,सर्व परिचित होतोच. चुलते आकाराम तोडकर आरळे गावचे सरपंच होते. ते वारणा बॅंकेचे संचालकही होते . दरम्यान माझे वडिलांना सुद्धा डी. वाय. दादा जवळून ओळखत होतेच.डी. वायू. पाटील यांना शैक्षणिक व सामाजिक कार्य व्यापक करायचे होते. यासाठी त्यांना एक धाडसी धडाडीचा अभ्यासू कार्यकर्ता, तरुण सहकारी हवा होता. मी कसबा बावड्यात राहात असल्याने ते मला चांगले ओळखत होते. त्यांचा व माझा एका महत्वपूर्ण कामातून संबंध आला. त्या कामातून त्यांनी माझी पात्रता, कुवत, विचारधारा, कल्पकता, धाडस,निरपेक्ष वृत्ती प्रामाणिकता त्यांनी ओळखली. त्यानंतर चार ते पाच वेळा माझे घरी विश्वासू शिलेदारांच्या कडून बोलावणे पाठवून.मला आग्रहाणे डी. वाय. पाटील ग्रुपमध्ये बोलवून घेतले. मॅनेजमेंट मधील महत्वपूर्ण कामे व डॉ.डी. वाय. पाटील यांनी कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट स्थापन करून यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी या ट्रस्टचा १९८८ पासून विश्वस्त आणि सचिव म्हणून कार्यरत झालो. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वृद्धीसाठी जितके काही करता येईल तितकं मी भारावून कामे करत होतो. ग्रुपच्या व्यवस्थापनात मी होतो.महत्वपूर्ण कामे व प्रसिद्धीचे काम केले. त्यांचा विश्वासू सहकारी कोल्हापूर. पुणे व मुबंई. येथे विविध पदावरती, मॅनेजमेंटची, चॅलेंजिंग मी कामे केली . दरम्यान मी डाॅ. डी. वाय. पाटील यांच्या विषयी ‘ज्ञानदर्पण’ आणि ज्ञानपुष्प ही दोन पुस्तकं व गौरवग्रंथ लिहून संपादित केलेले आहेत.जवळ जवळ 1985 ते 2025 40 वर्ष त्यांच्या बरोबर निष्ठेने, प्रामाणिकपणे, निरपेक्ष वृतीने, पितापुत्र या नात्यानेच सचोटीने विविध मौल्यवान कामे केली. त्यांचा माझेवर प्रचंड विश्वास होता.शब्द हे प्रमाण मानून आम्ही कामे केली.

*पत्रकारिता महासंघाचा संचालक*

डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्य राज्यभर विस्तारत होते. मी डी. वाय. पाटील ग्रुपचा, विश्वस्त असल्याने आणि या संस्थाच्या बरोबरच विविध ठिकाणी विविध संस्थावर काम करत असल्याने माझे एकूण काम पाहून आमचाच सेवक,दादाचा स्वीय सहाय्य्क म्हणून थोडे दिवस काम केलेला.अकोला येथील पत्रकारिता महासंघाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी अखिल भारतीय लोक स्वातंत्र्य पत्रकारिता महासंघाच्या प्रमुख मार्गदर्शक संचालकपदी नियुक्ती केली.

*अनुराग प्रकाशन*

मी शिक्षण करत असतानाच कोल्हापूरातील शंभर pवर्षांपूर्वीच्या करवीर नगर वाचन मंदिरात आकौंटंट म्हणून काही वर्ष नोकरी केली. हे ग्रंथालय अतिशय समृद्ध. जुनं ग्रंथालय असल्याने अनेक दुर्मिळ ग्रंथ तसेच विविध विषयावरील आणि विविध प्रकारची पुस्तकं आहेत. मी काम करून फावल्या वेळात या ग्रंथालयातील कितीतरी पुस्तके वाचली. या वाचनाचा मला भविष्यात खूप लाभ झाला. मी लिहिता झालो आणि काही पुस्तकं प्रकाशित केली. मी ‘अनुराग प्रकाशन’ ही स्वतः प्रकाशन संस्था सुरू केली. सामाजिक, अध्यात्मिक, व्यक्ति चरित्र्य, गौरव ग्रंथ अशा स्वरूपाची पंधरा पुस्तके या संस्थेच्या मार्फत प्रकाशित केली.

*लिखाण*
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जीवनावर ज्ञानदर्पन व ज्ञानपुष्प या दोन पुस्तकांचे लिखाण केले.डॉ. डी. वाय. पाटलांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा, विविध महत्वपूर्ण जीवनातील आठवणी, प्रसंग,घटना, विविध प्रसंगीचे फोटो, त्यांच्यावरील लेख, पुस्तके, मिळालेली मानपत्रे, मिळालेले विविध पुरस्कार यांचे प्रेणादायी दालन म्हणून मी कोल्हापूर. तळेगाव दाबडे आणि नवी मुंबई या ठिकाणी त्यांच्या भव्य शैक्षणिक संकुलात स्थापन केलेले आहेत.याच बरोबर समाजातील काही नामवंत व्यक्तीमतवांच्या गौरव ग्रंथाचे संपादन करून संपादकीय जबाबदाऱ्या. पार पाडलेल्या आहेत.माझे विविध विषयांवरील लेख विविध दैनिकात वेळोवेळी प्रसिद्ध झालेले आहेत.

*अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे व्यवस्थापन*

65 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९२ साली कसबा बावडा कोल्हापूर येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश मंत्री होते. या साहित्य संमेलनाची संपूर्ण निवास, भोजन व ट्रान्सपोर्ट व्यवस्था. व्यवस्थापनाची जबाबदारी समितीने माझ्यावर सोपवली. मी ही जबाबदारी स्विकारून दिवस-रात्र काम करून संमेलन सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मोलाचा हातभार लावला.

*ज्योतिष परिषदेचे व्यवस्थापन*

कोल्हापूरात अखिल भारतीय ज्योतिष परिषदेचे आयोजन केले होते. ज्योतिष संघटनेने या परिषदेचे संपूर्ण व्यवस्थापन पाहण्याची संधी मला दिली होती. ही जबाबदारीही मी उत्साहाने आणि यशस्वीपणे पार पाडली.

*हनुमान मंदिर जिर्णोद्धार*

लाईन बाजार (कोल्हापूर) येथे जुने हनुमान मंदिर होते. हे मंदिर पुनः बांधणे आवश्यक होते. या मंदिराच्या जिर्णोद्धाराची अपुरी राहिलेली जबाबदारीही तेथील आम भक्तांनी व जनतेने माझ्यावर टाकली. मला मंदिराच्या बांधकामासाठी, व धार्मिक कार्यक्रमासाठी हनुमान मंदिर देवस्थान समितीने व स्थानिकांनी खूप मदत केली.त्यामुळे अपुरी सर्व कामे पूर्ण केली.यामुळे तेथे आकर्षक मंदिर साकारले. या मंदिराचा कलशारोहण, वास्तुशांती आणि धार्मिक कार्यक्रमाचे,महाप्रसादाचे भव्य दिव्य भरगच्च आयोजन केले होते.दिनांक ९ डिसेंबर, २०२१ रोजी करवीर पिठाचे जगदगुरु (हिंदू धर्मगुरू )श्री. विद्यानरसिंह भारती महाराज यांच्या अमृत हस्ते संपन्न झाला.

*डॉ. डी. वाय. पाटील बॅंकेची स्थापना*

शेतकरी व सर्व सामान्यांना कमी व्याजदरात विनासायास त्वरित कर्ज उपलब्ध व्हावे याचबरोबर ठेवी सुरक्षित राहून रास्त परतावा मिळावा यासाठी व डॉ. डी. वाय दादा यांचे तीव्र इच्छा आणि स्वप्नपूर्ती करणेसाठीच डॉ. डी. वाय. पाटील सहकारी बँक स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि नंतर डी. वाय. पाटील यांच्या नावाने नामकरण करण्यात आले. बॅंक स्थापन करण्यात आणि नामकरण करण्यात मीच प्रामुख्याने पुढाकार घेतला. या बॅंकेचा प्रमुख म्हणून सुरूवातीच्या काळात मीच प्रमुख कार्यकारी अध्यक्ष म्हणून सर्व कामकाज पाहत होतो.वेळप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी(जनरल मॅनेजर )म्हणूनही काही काळ काम करावे लागले.अल्पावधीतच ही बॅंक भरभराटीला आली. सुस्थितीत आणून त्यांच्या वारसाच्या ताब्यात नेऊन दिलेली आहे. त्याचप्रमाणे टोप ता. हातकणंगले येथील श्री. आप्पासाहेब गायकवाड यांच्या श्री. साई चारिटेबल ट्रस्टच्या. साई मंदिरच्या विविध धार्मिक उत्सवात त्यांना मदतीची भूमिका नेहमीच ठेवलेली आहे. गेली पंचवीस वर्ष टोप ते शिर्डी सातत्याने अल्प शुल्कात हजार ते बाराशे लोकांना दर्शनासाठी साई दिंडीचे आयोजन केले जाते. त्या सर्व कार्यक्रमांस सर्वोतपरी सहभाग घेऊन सहकार्य असते. मंदिरात नेहमी गुरुवारी भक्तांच्या माध्यमातून म्हाप्रसादाचे नित्य नेमाने आयोजन केले जाते. किर्तन, प्रवचन, भजन, पारायण, व्याख्याने यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सहभाग असतोच. या साई ग्रुपचे जवळजवळ तीन ते चार हजार साई भक्त आहेत.महालक्ष्मी मंदिरात श्री. सिद्धिविनायक मंडळाच्या वतीने आयोजित 1जानेवारी ते 6 जून या सहा महिन्याच्या स्त्रात विविध कीर्तने व प्रवचनाचे आयोजन केले जाते त्यामध्ये सहभाग गेली 20 वर्ष असतो.कोल्हापूर शहर व जिल्हा, तसेच काही राज्य व देश पातळीवर काम करणारया संघटना, संस्था यांना समजपयोगी कामात नेहमी मदतच असते.विविध सामाजिक चळवळीतील जागृत संघटनाना त्यांच्या कामात पाठबळ असते.हे काम गेली 25 ते 30 वर्ष सातत्याने चालूच आहे.याशिवाय अंध अपंग, मतिमंध, अनाथ मुलांच्या आश्रम संस्था यांना देखील वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून मदत केलेली आहे. गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा व उपचार संस्थेच्या माध्यमातून मोफत वेळोवेळी कोल्हापूर. पुणे व मुंबई येथे संस्थेच्या माध्यमातून दिलेले आहेत.निरोगी. साक्षर व निरव्यसनी समाज निर्मितीसाठी सातत्याने आमच्या काही संस्थांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न चालू आहेतच.याशिवाय सहकार, शिक्षण, सामाजिक, आध्यात्म, सांस्कृतिक.याविविध स्तरावर्ती काम करत.समाजाचा सर्वांगीन विकासात हातभार आहे.•

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??