ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यालयात प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण मिळवत आपली गुणवत्ता वाढवावी. सौ. जयश्री चंद्रकांत पाटील

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यालयात प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण मिळवत आपली गुणवत्ता वाढवावी. सौ. जयश्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
ईश्वरपूर/ प्रतिनिधी
कामेरी तालुका वाळवा येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कामेरी शाळेतून सकस, गुणवत्ताधारक व सुसंस्कारी विद्यार्थी घडत आहेत. शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. विद्यालयाची गुणवत्ता उत्तम असल्याने या विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सौ. जयश्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कामेरी (ता. वाळवा) येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व माननिय छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूल मध्ये आयोजित नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तके वितरण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून सौ. जयश्री पाटील बोलत होत्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीपराव चरणे व गर्ल्स हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनुराधा पेडणेकर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष एस. आर. पाटील, जायंट्स सहेली ग्रुप ईश्वरपुरच्या फेडरेशन ऑफिसर ऍडव्होकेट विद्या पाटील, जायंट्सच्या अध्यक्षा प्रिया भोंगाळे, सचिव देवयानी पिसे यांची भाषणे झाली.
जायंट्स सहेली ग्रुपच्या वतीने विद्यालयाला रोपे भेट दिली. शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी झाले.
यावेळी शाळा सल्लागार समितीचे उपाध्यक्ष एस. वाय. पाटील, सदस्य सुजाता पाटील, शशिकांत पवार, बाळासाहेब कापसे, प्रभारी पर्यवेक्षक उमेश जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. मुख्याध्यापक दिलीपराव चरणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. समक्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका सुवर्णा यादव यांनी आभार मानले.कामेरी (ता. वाळवा) येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालयात नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शाळा सल्लागार समितीच्या अध्यक्षा सौ जयश्री चंद्रकांत पाटील. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??