दुष्काळ सदृश्य परिस्थितीत जास्त पाण्याची ऊस व केळी पिके घेऊन आहेत डॉक्टर अशोकराव ढगे

नेवासा:: तालुक्यामधील सौंदाळा या गावात ग्रामपंचायत व सिंजेंटा कंपनीमार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक ढगे यांनी कमी पाण्याची खरीप हंगामातील बाजरी पूर्व मका यांचे देशी वाण घ्यावीत असे आवाहन केले डॉक्टर ढगे पुढे म्हणाले की महाराष्ट्र शासनाने प्रकल्प वर्षा हा कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने हाती घ्यावा शेतकऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये बाष्पविरोधक, रासायनिक खतांचा कमी वापर, जैविक सेंद्रिय खतांचा अधिक वापर, तरी आड सरी भिजविणे यासारख्या तंत्राचा वापर करावा व्हीएसआय पुणे संस्थेमधून सेवानिवृत्त झालेले ऊस विशेषज्ञ डॉक्टर रमेश हापसे यांनी ऊस उत्पादन वाढीच्या उभ्या पिकासंदर्भात सविस्तर तंत्रज्ञान सांगून मार्गदर्शन केले सिंजेंटा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक पवन थोरात यांनी हुमणी अळी बंदोबस्ताबाबत प्रकाश सापळा व इतर उपाययोजना सुचविल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉम्रेड बाबा आरगडे होते मेळाव्याच्या नियोजनासाठी नामदेव गव्हाणे बबलू परसु वाले महेश नागवडे यांनी परिश्रम घेतले डॉ ढगे पुढे म्हणाले की सौंदाळा येथे माणुसकीची भिंत, शिवी दिल्यास दंड, जात उच्चाटन यासारख्या उपक्रमातून या गावाची ओळख सामाजिक क्रांतीचे माहेर अशी झाली आहे. सरपंच शरद आरगडे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले शेतकरी मेळाव्याला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते



