ताज्या घडामोडी

उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वासार्ह पर्याय

तळसंदेतील डी. वाय. पाटील विद्यापीठ
हे उद्योगाभिमुख शिक्षण, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि करिअरच्या व्यापक संधींचा संगम : डॉ. शंकर पुजारी 

तळसंदे :
बदलत्या जागतिक शैक्षणिक व औद्योगिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे (ता. हातकणंगले) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यावर्षी डिझाईन आणि कायदा शिक्षण देणारे अभ्यासक्रम त्याचबरोबर दहावीनंतर अभियांत्रिकी पदवी देणारा सहा वर्षांचा इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आल्याची माहिती प्रवेश प्रक्रिया संचालक प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी दिली.

कुलपती डॉ. संजय डी.पाटील, प्र- कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाची शैक्षणिक, संशोधन आणि कौशल्यविकास क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

डॉ. पुजारी म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये, संशोधनवृत्ती, नेतृत्वगुण, संवाद कौशल्ये आणि उद्योग क्षेत्राशी सुसंगत ज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. याच दृष्टीने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची रचना केली आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड बी.टेक. (डिप्लोमा + डिग्री) हा अभिनव अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यामुळे कमी कालावधीत तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळण्यास मदत होते. यामध्ये ६ वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून अभियंता बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

व्यवस्थापन क्षेत्रात बीबीए, एमबीए, अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए (फार्मास्युटिकल मॅनेजमेंट), बीबीए, एमबीए तसेच ग्लोबल एमबीए हे अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, उद्योजकता, आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि नेतृत्व विकासाच्या संधी उपलब्ध होतात.

कायदा क्षेत्रात बी.ए. एल.एल.बी. व एल.एल.बी. त्याचबरोबर बीसीए व एमसीए, तर सर्जनशील क्षेत्रात बॅचलर ऑफ डिझाईन अंतर्गत व्हिज्युअल कम्युनिकेशन, यूआय/यूएक्स, अॅनिमेशन, प्रॉडक्ट डिझाईन तसेच इंटिरिअर अँड स्पेस डिझाईन यांसारखे अभ्यासक्रम नव्या युगातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देत आहेत

याशिवाय बी.एस्सी. डेटा सायन्स, एम.एस्सी. ऑर्गेनिक केमिस्ट्री, अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांसारखे आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम संशोधन व उद्योग क्षेत्रातील संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहेत.

विद्यापीठामध्ये आधुनिक प्रयोगशाळा, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्राशी असलेले सहकार्य, इंटर्नशिप, प्लेसमेंट सहाय्य, संशोधनाच्या संधी तसेच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध मेरिट स्कॉलरशिप योजनाही उपलब्ध आहेत.

करिअरला योग्य दिशा देणारे शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि जागतिक स्तरावरील संधी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी डी. वाय. पाटील ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे येथे भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन डॉ. पुजारी यांनी केले. प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी : डॉ. शंकर पुजारी, ( डायरेक्टर ऍडमिशन्स ) : 9922772522 या नंबर वर संपर्क साधावा.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??