
माजी मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक.
शिराळा प्रतिनिधी
शिराळा येथील निवासस्थानी डॉ. रणजीत सिंह आनंदराव पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज (Miraj Medical College) येथून एमबीबीएस (MBBS) पदवी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! शिवाजीराव नाईक यांनी केले.
नाईक पुढे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज (GMC Miraj) या नामांकित संस्थेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण.करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने अभ्यास करून रणजीत पाटील यांनी हे यश संपादन केले. या त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळणार आहे.डॉ. रणजीत पाटील यांच्या या यशाबद्दल काळुंद्रे ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिराळा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
यावेळी सिद्धेश्वर शिक्षण संस्थेची सचिव जे बी पाटील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील आदीअन्यवर उपस्थित होते.



