ताज्या घडामोडी

शिराळा प्रतिनिधी

सागाव ता. शिराळा येथील कु. साक्षी सुभाष पाटील यांची मुंबई पोलिस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले की, “ग्रामीण भागातील मुली आज विविध क्षेत्रांमध्ये यशाची नवी शिखरे गाठत आहेत. कु. साक्षी पाटील यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मुंबई पोलिस दलात स्थान मिळवून सागाव गावासह संपूर्ण शिराळा तालुक्याचा सन्मान वाढवला आहे. त्यांचे यश इतर युवक-युवतींसाठी प्रेरणादायी असून त्यांनी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावून समाजात आदर्श निर्माण करावा.
यावेळी साक्षी पाटील यांच्या यशाबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. सागाव गावातील कन्येने मिळवलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी माजी सभापती चंद्रकांत पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष सत्यजित पाटील, गोरख पाटील, सुभाष पाटील, अवधूत पाटील, रविंद्र पाटील, हणमंत पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??