
एल निनो २०२६ जगावर 170 वर्षांनी पुनश्च मोठे संकट आले आहे. धोरणात्मक कृषी निर्णय आवश्यक. नवीन आडसाली उसाची लागवड करू नये. खरीप हंगामात बाजरी चे देशी वाण वापरावेत. बाजरीला कमी पाणी लागते त्यामध्ये मिश्र पीक घ्यावे. खरीप हंगामात ज्वारी पीक घेतल्यास चारा सुद्धा मिळू शकेल. कपाशी काही ठिकाणी लागवड झाली आहे तथापि नवीन लागवड करताना देशी वाण कमी मुदतीचा घ्यावा. पाण्याचे शेतामध्ये नियोजन प्रत्येक थेंबावर जास्त पीक हा विचार करावा. शहरामध्ये पाण्याचा वापर मर्यादित व काटकसरीने करावाच लागेल त्यासाठी जागृती आवश्यक आहे. 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये अन्यथा दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. सेंद्रिय खताचा शक्य तेवढा वापर व वाढवावा रासायनिक खते अत्यल्प व फवारणी द्वारे शक्य तेथे द्यावीत ड्रोन मुळे कमी पाणी लागते त्याचाही विचार उच्च तंत्रज्ञान म्हणून करावा. युरिया खत जमिनीद्वारे न देता फवारणी द्वारे द्यावे रान बांधणी मध्ये बीबीएफ चा वापर महत्त्वाचा आहे. पाण्याचा ताण सहन करणारीच पिके घ्यावीत . सोयाबीन पाण्याचा ताण सहन करू शकत नाही ते संवेदनशील पीक आहे त्यातील योग्य वाणाचा विचारपूर्वक वापर करावा. तुरीचे संकरित वाणापेक्षा कमी कालावधीचे देशी वाण वापरावेत. पेरणीनंतर तंत्रज्ञानाचा वापर करताना कृषी खाते व कृषी विद्यापीठांचा सल्ला घ्यावा. जग भारत देश व त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पाण्याचे संकट मोठे आले आहे महाराष्ट्रातील प्रकल्प वर्षा प्रयोग तातडीने राबवावा असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी दिला आहे



