ताज्या घडामोडी

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा आष्टा नगपालिकेतर्फे सत्कार

ईश्वरपूर/ प्रतिनिधी
भारताच्या जनगणना कार्यक्रम मध्ये आष्टा शहराची घरगणना नुकतीच करण्यात आली. आष्टा नगरपालिकेच्या वतीने केंद्रशासनाच्या निर्देशानुसार ही घरगणाना अतिशय नियोजनबद्ध आणि मर्यादित कालावधीमध्ये पूर्ण झाली. या मध्ये शहरासाठी ५८ प्रगणकांची घर गणना प्रगणक म्हणून निवड करण्यात आली होती. या प्रगणकांच्या मध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील संकुलातील ९ प्रगणकानी सहभाग घेतला. या मध्ये सर्वात जास्त गणना घरांची नोंद, सर्वात जास्त निवासी इमारतींची नोंद आणि घर गणनेचे काम सर्वात जलद गतीने पूर्ण करण्यामध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ईश्वरपूर च्या शिक्षकांनी बाजी मारली आहे. प्राथमिक आश्रमशाळा आष्टा च्या सहाय्यक शिक्षिका जयश्री ताटे, सन्मती आवटी यांनी तर माध्यमिक विभागाकडील शंकर पाटील यांनी हे काम अतिशय उत्तमपणे केल्याबद्दल नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष विशाल शिंदे यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आष्टा संकुलातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील सुरेश पाटील, आशाराणी माळी , मीनाक्षी जाधव, उद्धव पाटील, सुनिता पाटील यांनी हे काम उत्तमपणे आणि नियोजीत वेळेत पार पडले., यावेळी चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, जनगणना नोडल अधिकारी अनिकेत हेंद्रे, पर्यवेक्षक रोहित वायचळ, सुयश कुलकर्णी, शिरीष काळे, पूनम पाटील, प्रियांका भोसले , प्रशासन अधिकारी रघुनाथ मोहिते उपस्थित होते, या सर्व कर्मचाऱ्यांचा अभिनंदन संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब डांगे, सचिव चिमन डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे, व्यवस्थापक सुनिल शिंनगारे, मुख्याध्यापक रघुनाथ बोते, विकास बेंद्रे, डॉ. आनंद मेटकरी यांनी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??