
( कल्याण प्रतिनिधी )
कवी कट्टा कल्याण मुंबई आयोजित सामाजिक प्रबोधनाचे कवी संमेलन गुलमोहर कॉलनी, विजयनगर कल्याण पूर्व येथे कवी शाम बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कवी संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून कवी अशोक भवार , कवी कट्टा कल्याण मुंबईचे अध्यक्ष नवनाथ रणखांबे आणि सार्थक साहित्य प्रकाशनच्या प्रकाशिका प्रा. आशा रणखांबे या मान्यवरांची उपस्थिती होती. कवी संमेलनात सामाजिक प्रबोधनाच्या दर्जेदार विविध विषयांवर कविता यावेळी सादर करण्यात आल्या.



