अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या दौऱ्यात डॉ ढगे यांनी मांडले जायकवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न

नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे दिनांक 26 मे 2026 रोजी विठ्ठल मंदिरामध्ये जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्न संबंधात सांगोपांग चर्चा झाली जायकवाडी धरणग्रस्त पुनर्वसन होऊन 52 वर्षे झाली काही प्रश्न सुटले असले तरी नव्याने काही प्रश्न निर्माण झाले आहे त्या संदर्भात डॉक्टर अशोकराव ढगे माजी कुलगुरू यांनी सविस्तर निवेदन अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना दिले. जमिनीच्या वर्गीकरणाबाबत हिंगे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन जागेवर अनेक नियम उलगडा करून प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉक्टर ढगे यांनी मच्छीमारांचा प्रश्न मांडून जायकवाडी धरणाच्या पाण्यावर चांगल्या जातीचे मत्स्यबीज सोडावे तसेच स्मशानभूमीच्या संदर्भात अधिक निधी उपलब्ध करून द्यावा आणि या भागात होत असलेली वृक्षतोडीच्या संदर्भात वनविभागाला गांभीर्याने सूचना कराव्यात धरणग्रस्त गावांना जोडणारी रस्ते तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन साठी महावितरणाला सूचना द्याव्यात अशा प्रश्नांचा उहापोहो डॉक्टर ढगे यांनी केला. याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते वसंतराव डावकर, नितीन भालेराव, केशव वाघमारे, मोहिनीराज कदम, दत्तात्रेय आगळे संतोष कोरडे भाऊसाहेब चव्हाण सर्कल कुसमुडे, तहसीलदार म्हात्रे, डॉक्टर करण सिंग घुले आणि प्रवरा संगम, टोका माळेवाडी खेडले काजळी मंगळापूर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



