श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व लोकमान्य हॉस्पिटल्स, गोखले नगर रोड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच “मोफत महाआरोग्य शिबिर”

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व लोकमान्य हॉस्पिटल्स, गोखले नगर रोड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच “मोफत महाआरोग्य शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.
या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या लोकमान्य हॉस्पिटल्स तर्फे लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया व हृदयविकारासंबंधित प्रोसिजर्स पूर्णतः मोफत करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले.
तसेच इतर वयोगटातील रुग्णांसाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, आमचे लोकमान्य हॉस्पिटल्स, वेताळबाबा चौक, गोखले नगर, सेनापती बापट रोड, पुणे हे रुग्णालय कोणत्याही शासकीय आरोग्य योजनांमध्ये — जसे की महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MPJAY) अथवा आयुष्मान भारत योजना — समाविष्ट नाही.
त्यामुळे येथे करण्यात येणारी मोफत शस्त्रक्रिया, उपचार व वैद्यकीय मदत ही विविध सामाजिक संस्था, ट्रस्ट व दानशूर व्यक्तींनी केलेल्या आर्थिक सहकार्याच्या माध्यमातूनच शक्य होत असते.
त्यामुळे समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उपचारांपासून वंचित रुग्णांनी ह्यांचा लाभ घ्यावा
आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सादर.डॉ. अशोक घोणे
वरिष्ठ सल्लागार ,प्रमुख – सोशल सर्विस डिपार्टमेंट
लोकमान्य हॉस्पिटल्स, पुणे – १६
संपर्क :
श्री. शरद काथवटे / सौ. प्रगती
+91 77208 88881 / +91 98220 01643



