कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संख्याशास्त्र’ यावर प्रा. ए.बी. पाटील यांचे व्याख्यान

पी.व्ही.पी. महाविद्यालयात संख्याशास्त्राचे अतिथी व्याख्यान
कवठेमहांकाळ : दि. ७ (प्रा. विजय कोष्टी)
येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील बी.एस्सी. शाखेकडील संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी.भाग-तीन च्या SEC प्रात्यक्षिक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर नुकतेच महाविद्यालयामध्ये अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिथी व्याख्याते म्हणून लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय, मिरज येथील संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक ए.बी.पाटील उपस्थित होते. या वेळी AI and Statistics: The Foundation of Modern Data Science या अत्याधुनिक विषयावर पाटील सरांनी सुलभ आणि उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स यामध्ये संख्याशास्त्राचे मूलभूत स्थान कसे आहे, तसेच भावी करिअरच्या संधी कोणत्या आहेत याचे विवेचन त्यांनी केले. यानंतर त्यांनी विशेषतः Botany आणि Zoology च्या विद्यार्थ्यांसाठी ‘Nursery Development, Grapes Consultancy, Goat Farm Project, Fishery Project’ आदी क्षेत्रांत करिअरच्या संधी आहेत, हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित उदाहरणासह स्पष्ट केले. स्वतःचा Goat Farm व Fish Project कसा सुरू करता येतो, याची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. व्याख्यानानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांना प्रा. पाटील यांनी उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भविष्यातील रोजगार, स्टार्टअप्स, उद्योजकता याबाबतही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि महाविद्यालयाचे वार्षिक ‘वसंत’ देऊन केले. प्रास्ताविका मध्ये प्रा. विजय कोष्टी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि अतिथि व्याख्यानाचे उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांदरम्यान अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली. तसेच बी.एस्सी. पदवी नंतर च्या शिक्षणासाठी चे विविध पर्याय आणि संधी विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात यासाठी हे व्याख्यान आयोजित केले असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल झरेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील यांनी केले. सदर व्याख्यानासाठी संख्याशास्त्र विषयाचे तसेच Botany आणि Zoology चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यान कार्यक्रमाचे नियोजन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव सुदर्शन शिंदे, प्र. प्राचार्य डॉ. जी. डी. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अण्णासाहेब सुर्यवंशी आणि प्रा. गणेश सातपुते यांनी केले.



