ताज्या घडामोडी

तालुकास्तरीय 17 वर्षाखाली मुलींच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील मुलींच्या संघाचा विजय

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर आज झालेल्या तालुकास्तरीय 17 वर्षाखाली मुलींच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील मुलींच्या संघाने पटवर्धन हायस्कूलच्या मुलींच्या सतरा वर्षाखाली क्रिकेट संघावर विजय मिळवला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार षटकात पाच गडी बाद खंडाळा संघाने 28 धावा केल्या प्रत्युत्तर दाखल पटवर्धन हायस्कूलच्या मुलींच्या संघाला चार षटकात आठ गडी बाद 16 धावाच करता आल्या.खंडाळा संघाने हा सामना 12 धावांनी आरामात जिंकला व जिल्हास्तरीय होणाऱ्या 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात आपली निवड निश्चित केली. या संघामध्ये निधी सावंत,सलोनी गुरव, पूर्वा सावंत, प्रिया अजगोलकर,अंतरा वरवटकर,संजना रामाने,सलोनी रामाने,गौरी धनावडे,ममता चौगुले, तेजस्वी धनवडे,श्रेया मालप, इच्छा शिंदे,श्रेया चौगुले, सिया चौगुले, अनुष्का सावंत, संस्कृती चौगुले संघात होत्या तर क्रीडाशिक्षक डॉ.राजेश जाधव,पल्लवी बोरकर यांनी मार्गदर्शन केले.या संघाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे,उपाध्यक्ष रामनाथशेठ आडाव,सचिव समीरशेठ बोरकर, संदीप सुर्वे,दिवाकर जोशी,अनिकेत सुर्वे,तुषार चव्हाण,किशोर मोहित, सीइओ बाबुशेठ पाटील,मुख्याध्यापक शिवाजी जगताप,पर्यवेक्षक आनंदा पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक पालक संघाने मुलींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??